राष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षाचा भाजपने केला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:13 IST2021-01-02T04:13:27+5:302021-01-02T04:13:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मेहबूब इब्राहिम शेख यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. तरुणीला ...

BJP protested against NCP's youth state president | राष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षाचा भाजपने केला निषेध

राष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षाचा भाजपने केला निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मेहबूब इब्राहिम शेख यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. तरुणीला नोकरी देण्याचे आश्वासन देऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी भाजपने निषेध केला आहे.

बुध‌वार, ३१ डिसेंबर रोजी जळगाव ग्रामीण भाजप जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर भारती सोनवणे, महिला प्रदेश उपाध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, सरचिटणीस महेश जोशी उपस्थित होते. त्यांनी यावेळी निषेधाच्या घोषणा दिल्या. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची घोषणा केली. यावेळी महिला महानगराध्यक्ष दीप्ती चिरमाडे, युवा मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद सपकाळे, नगरसेवक सिंधु कोल्हे, पार्वताबाई भिल, प्रिया जोहरे, शरिफा तडवी, युवा मोर्चा सरचिटणीस जितेंद्र चौथे, मिलिद चौधरी, अक्षय जेजुरकर, रेखा वर्मा, नितु परदेशी, शोभा कुलकर्णी, अबोली पाटील, निकिता महाजन, भाग्यश्री चौधरी, विद्या सोनवणे, छाया सोनवणे, लता बाविस्कर, पूजा चौधरी, राधिका वर्मा, तृप्ती पाटील, सचिन बाविस्कर, राहुल मिस्त्री, रियाज शेख, गणेश महाजन, स्वामी पोतदार, सागर जाधव, जयंत चव्हाण, तेजस भोळ‌े, सकीब शेख, गौरव पाटील, पुष्पेंद्र जोशी, ऋषी येवले, महेश राठी, बाळु मराठे, पंकज सनांसे, धीरज वर्मा, शैलेश गुरव, मयूर भोई, कुणाल सोनवणे, आकाश पाटील उपस्थित होते.

Web Title: BJP protested against NCP's youth state president