शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

...अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 14:36 IST

Suresh Bhole Video : गणपती विसर्जन मिरवणुकीत कार्यकर्त्याच्या खांद्यावर बसताना तोल गेला आणि आमदार सुरेश भोळे खाली पडले. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

Maharashtra Viral Video : गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात भाजप आमदार सुरेश भोळे कार्यकर्त्याच्या खांद्यावरून खाली पडल्याचे दिसत आहे. जळगाव शहरात विसर्जन मिरवणुकीदरम्यान ही घटना घडली.  

जळगाव शहरात मोठ्या उत्साहात गणपती विसर्जन मिरवणूक काढण्यात आल्या होत्या. या मिरवणुकीत कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन, जळगाव शहरचे आमदार सुरेश भोळे हेही सहभागी झाले होते. 

गिरीश महाजन यांनी गाण्याच्या तालावर ठेका धरला होता. आमदार सुरेश भोळेही त्यामध्ये सामील झाले. त्याच वेळी पाठिमागून एक कार्यकर्ता आला अन् हा प्रसंग घडला. 

गणपती विसर्जन मिरवणुकीत नाचत असताना एका कार्यकर्त्याने भाजप आमदार भोळे यांना खांद्यावर घेण्याचा प्रयत्न केला. पण, भोळे यांना खांद्यावर घेऊन उभे राहत असतानाच तोल गेला आणि भोळे खाली पडले. यावेळी आजूबाजूच्या लोकांना त्यांना पटकन हात दिला आणि उभे केले.

सुदैवाने यात आमदार सुरेश भोळे यांनाही कोणतीही दुखापत झाली नाही. यावेळी कार्यकर्त्यांसोबत नाचत असलेले गिरीश महाजनही धावत आले. त्यांनी कार्यकर्त्यांना समजावले आणि सगळे जण नाचायला लागले. 

टॅग्स :JalgaonजळगावGirish Mahajanगिरीश महाजनGanesh Mahotsavगणेशोत्सव 2024Maharashtraमहाराष्ट्रSocial Viralसोशल व्हायरल