वरणगावात भाजपचा नगरपरिषदेवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:22 IST2021-09-17T04:22:27+5:302021-09-17T04:22:27+5:30

वरणगाव, ता. भुसावळ : वरणगावकरांना २४ तास पिण्याचे पाणी मिळण्यासाठी २५ कोटींची योजना भाजपच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आली ...

BJP marches on Municipal Council in Varangaon | वरणगावात भाजपचा नगरपरिषदेवर मोर्चा

वरणगावात भाजपचा नगरपरिषदेवर मोर्चा

वरणगाव, ता. भुसावळ : वरणगावकरांना २४ तास पिण्याचे पाणी मिळण्यासाठी २५ कोटींची योजना भाजपच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आली आहे. त्याचे काम ठेकेदाराला देण्यात आले आहे. पाण्याच्या सहा टाक्यांचे काम संथगतीने सुरू आहे. ते काम जलदगतीने व्हावे व इतर कामेसुद्धा लवकर मार्गी लागावी या मागणीसाठी भाजपच्यावतीने गुरुवारी नगर परिषदेवर मोर्चा काढण्यात आला.

या विविध मागण्यांमध्ये पाईपलाईनसाठी खोदलेल्या रस्त्यांमध्ये पाईप टाकून रस्ते तत्काळ दुरुस्त करावे. निरनिराळ्या प्रभागांमध्ये निर्माण केलेल्या बगीचांची पूर्ण वाताहात झाली आहे. पाच वर्षांसाठी देखभाल दुरुस्तीचा करार नगरपरिषद व ठेकेदारांमध्ये झाला असतानासुद्धा ठेकेदारांनी बगीचांची कामे अर्धवट सोडून नगरपरिषदेच्या तोंडाला पाने पुसली आहेत. अशा ठेकेदारावर कारवाई करून काळ्या यादीत टाकण्यात यावे व बगीचे नागरिकांसाठी खुले करावे. शहरात फवारणी व धुरळणी करावी, तसेच जलशुद्धिकरण केंद्रातील पाणी शुद्धिकरण संयंत्र सुरू करून ' नागरिकांना क्लोरीनयुक्त शुद्ध पाणीपुरवठा करावा या मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला.

यावेळी प्रांताधिकारी तथा प्रशासक रामसिंग सुलाने यांनी मंजूर पाणीपुरवठा योजनेचे काम जलद गतीने करून सर्व मागण्यांच्या बाबतीत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक शेख, अल्लाउद्दीन यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: BJP marches on Municipal Council in Varangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.