शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गिरीश महाजनांच्या 'पीए'ने जिंकले १ लाख रुपये; राष्ट्रवादीचा कार्यकर्ता ते घेऊनही आला, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 15:12 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडिया सेलचे जळगावातील पदाधिकारी राहुल पाटील यांनी अरविंद देशमुख यांचं आव्हान स्वीकारलं.

- प्रशांत भदाणे

जळगाव- भाजपा नेते गिरीश महाजनांचा पीए अरविंद देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता राहुल पाटील यांच्यात राज्यसभा निवडणुकीच्या मुद्द्यावरून एक लाख रुपयांची पैज लागली होती. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचे तीनही उमेदवार जिंकणार असं सांगत अरविंद देशमुख यांनी चॅलेंज केलं होतं. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी लाखांच्या पैजेचं आव्हानही दिलं होतं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडिया सेलचे जळगावातील पदाधिकारी राहुल पाटील यांनी अरविंद देशमुख यांचं आव्हान स्वीकारलं. मात्र राहुल पाटील पैज हरला. त्यामुळे राहुलने शनिवारी दुपारी एक लाख रुपयांचा धनादेश अरविंद देशमुख यांना देण्यासाठी गिरीश महाजनांच्या जी. एम. फाउंडेशन या कार्यालयात आणला होता. पण अरविंद देशमुख यांनी एका कार्यकर्त्याचा सन्मान म्हणून एक लाख रुपयांचा धनादेश राहुल पाटलांना परत केला. अरविंद देशमुख आणि राहुल पाटील यांच्यातल्या पैजेची राज्यभर चर्चाही रंगली होती

गिरीश महाजन यांनी यापूर्वी झालेल्या अनेक निवडणुकांमध्ये राजकीय गणितांची जुळवाजुळव यशस्वीपणे केली आहे. आताही राज्यसभेच्या निवडणुकीत त्यांच्यावर मोठी जबाबदारी होती. त्यामुळं भाजपला निश्चित यश मिळेल, हा विश्वास असल्याने मी पोस्ट केली होती. मुळात ही पैज मी पैशांसाठी लावली नव्हती. म्हणून पैज जिंकल्यानंतर मी राहुल पाटील यांना धनादेश परत केला. एक सच्चा कार्यकर्ता म्हणून राहुल यांचा मला अभिमान वाटला. -अरविंद देशमुख, गिरीश महाजनांचे पीए

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवारांवर आपला दृढ विश्वास आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत त्यांचे डावपेच यशस्वी होतील, हा विश्वास होता. तो सार्थ ठरला, पण दुर्दैवाने संजय पवारांचा पराभव झाला. पैज हरल्यानं मी पैसे द्यायला आलो होतो, पण अरविंद देशमुख यांनी मोठ्या मनाने मला धनादेश परत केला. -राहुल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाGirish Mahajanगिरीश महाजनBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस