भाजपला घरचा आहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 01:01 AM2019-08-18T01:01:32+5:302019-08-18T01:01:52+5:30

भाजपच्या इनकमिंगवर एकनाथराव खडस यांचे टीकात्मक वक्तव्य

BJP is home | भाजपला घरचा आहेर

भाजपला घरचा आहेर

Next

विजयकुमार सैतवाल
जळगाव : पक्षात येणाऱ्यांची निष्ठा तपासल्यास पक्षातील निष्ठावंतांवर अन्यायही होणार नाही, असे म्हणणाºया एकनाथराव खडसे यांनीच भाजपच्या इनकमिंगवर टीकात्मक वक्तव्य करीत भाजपला घरचा आहेर दिला आहे.
भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या सध्या मोठी असल्याने १४ रोजी जळगावात झालेल्या भाजप शक्ती केंद्र प्रमुखांच्या बैठकीत खडसे यांनी पक्षात येणाºयांची निष्ठा तपासा, असे आवाहन केले होते. त्याविषयी खडसे यांचे म्हणणे आहे की, या पूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील पक्षात येणाºयांच्या निष्ठेबाबत वक्तव्य करीत सध्या सत्ता असल्याने अनेक जण आपल्याकडे येत असल्याचे म्हटले होते. त्या वक्तव्याशी मी सहमत आहे. पक्षात येणाºयांची निष्ठा तपासल्यास पक्षातील निष्ठावंतांवर अन्यायही होणार नाही, असेही त्यांनी बोलून दाखविले. ज्यांनी आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले अथवा आम्ही ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना पक्षात घेताना विचार व्हायला हवा, असे मत त्यांनी व्यक्त केले.
एककीडे एकनाथराव खडसे हे प्रवेश देताना निष्ठा तपासा असे सांगत असताना दुसरीकडे गिरीश महाजन यांनी तळागळातील प्रत्येक कार्यकर्त्याला पक्षात घ्या, हा कामाचा नाही, तो कामाचा नाही, असे म्हणून नका, असे सांगितले. त्यामुळे दोन्ही नेत्यांचे विरोधाभास निर्माण करणारे वक्तव्य कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकणारे आहे.
या सोबतच पक्षाकडून उमेदवारी मिळते की नाही, या विषयी या पूर्वीदेखील खडसेंनी शंका व्यक्त करणारे वक्तव्य केले होते. त्यानंतर शनिवारी पुन्हा मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातून भाजपच्यावतीने सध्या रोहिणी खडसे - खेवलकर यांच्या नावाची चर्चा असली तरी या मतदारसंघातून आपण इच्छुक असून मीच उमेदवारीची मागणी करणार आहे, असे खडसे यांनी जळगावात सांगितले.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा मतदार संघ असलेल्या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातून या वेळी खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे - खेवलकर यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे. त्यावर खडसे यांना घरातून या विषयी तयारी आहे का, असे विचारले असता ते म्हणाले की, पक्ष जो निर्णय घेईल जो उमेदवार असेल व त्याचा प्रचार केला जाईल. यात घरातील तयारीचा विषयच नाही. सोबतच प्रत्येकाला उमेदवारी मिळण्याची अपेक्षा असते. मात्र पक्ष मूल्यमापन करून निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले. मात्र मीच उमेदवारीची मागणी करणार आहे, असेही शेवटी त्यांनी सांगून टाकले.
खडसे यांच्या नावे बनावट डी़डी़ प्रकरणात नुकतीच सर्वोच्च न्यायालयाने अंजली दमानिया व गजानन मालपुरे यांच्यासह याचिकाकर्त्यांना नोटीस बजावल्या आहेत. या विषयी प्रतिक्रिया देताना खडसे म्हणाले की, या प्रकरणातील आदेशाची प्रत परवाच मला मिळाली. संंबंधितांना नोटीस बजावल्याने हा खटला पुन्हा जिवंत होऊन चौकशी सुरू होईल. याप्रकरणातील साडेनऊ कोटींचे बनावट डी.डी. व १० लाखाचा बनावट धनादेश आला कोठून याबाबतची सत्यता आता संबंधितांनी पटवून द्यावी,असे आव्हानाही त्यांनी दिले.

Web Title: BJP is home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव