भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष शरीफा तडवी यांचे कोरोनाने निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:15 IST2021-04-06T04:15:58+5:302021-04-06T04:15:58+5:30
जळगाव : गेल्या चार-पाच दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षा शरीफा रहेमान तडवी (४८) यांचे सोमवारी ...

भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष शरीफा तडवी यांचे कोरोनाने निधन
जळगाव : गेल्या चार-पाच दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षा शरीफा रहेमान तडवी (४८) यांचे सोमवारी दुपारी कोरोनामुळे निधन झाले.
जिजाऊनगर भागातील रहिवासी असलेल्या भाजपच्या उपाध्यक्ष शरीफा तडवी यांना त्रास होऊ लागल्याने ५-६ दिवसांपूर्वी कोर्ट चौकातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यादरम्यान त्यांची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. दररोज त्यांची प्रकृती खालावत गेल्याने अखेर सोमवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. तडवी यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी रुग्णालयात जाऊन तडवी यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
दुर्दैवी योगायोग
शरीफा तडवी यांची गेल्यावर्षी ४ एप्रिल २०२० रोजी भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. या निवडीच्या बरोबर एक वर्षानंतर ५ रोजी त्यांचे निधन झाले.