शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

भाजपचे नगरसेवक कोलते यांना लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 21:53 IST

दोघांविरुद्ध गुन्हा : कोलतेंविरुद्धही मारहाणीची तक्रार

भुसावळ : शहरातील भाजप नगरसेवकास लुटल्या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या फिर्यादीत दोघा आरोपींपैकी एकाच्या फिर्यादीवरुन या नगरसेवकासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत दिलेल्या फिर्यादी नुसार वृ्र असे की, नगरसेवक किरण कोलते हे हॉटेल बंद करून घराकडे निघाले असताना जामनेर रोडवरील दिनदयाल नगर जवळील नामांकित हॉटेल समोर संशयीत आरोपी संजय लोटन चौधरी व प्रशांत उर्फ मुन्ना संजय चौधरी (रा.भुसावळ) यांनी कोलते यांना शिवीगाळ करीत खिशातील पाच हजार ७०० रुपयांची रोकड हिसकावून पोबारा केला.याप्रकरणी दोघांविरुद्ध बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर २६ / २९ भादवि कलम ३९२ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना २३ रोजी रात्री पावणे बारा वाजता घडली. या प्रकरणी गुरुवारी पहाटे ५.५० वाजता बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील जोशी करीत आहेत.दरम्यान मारहाण प्रकरणात बांधकाम ठेकेदार संजय लोटन चौधरी (पंढरीनाथ नगर, जामनेर रोड, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार किरण कोलते, किशोर पाटील, मयूर कोलते, कल्पेश ढाके, दीपा पैलवान (सर्व रा.भुसावळ) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून या सहा जणांनी हॉटेल समोर २३ रोजी रात्री दोन दुचाकींवर काही एक कारण नसताना दगडफेक करीत शिवीगाळ केली, असा आरोप आहे. तपास नाईक रमण सुरळकर करीत आहे.कोलतेंसह सहा जणांविरुद्धही गुन्हाकोलते यांच्याविरुद्ध दिलेल्या फिर्यादीनुसार शहरातील दीनदयाल नगर जवळील नामांकित हॉटेल समोर गाळ्याचे बांधकाम सुरू असताना तक्रारदार संजय लोटन चौधरी यांनना शिवीगाळ करीत त्यांच्या मुलासह त्यांच्या भाच्याच्या दुचाकीवर दगडफेक करून वाहनाचे नुकसान केल्याप्रकरणी भाजपा नगरसेवक किरण कोलते यांच्यासह सहा जणांविरुद्ध बाजारपेठ पोलिस स्टेशनला गु. र. नं. २७ /२० भादवि कलम ४५२ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. २३ रोजी रात्री १२.४५ वाजता ही घटना घडली.