बी.जे. मार्केटमध्ये दुकान फोडून ग्राहकांचे पंखे लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:20 IST2021-09-07T04:20:54+5:302021-09-07T04:20:54+5:30

जळगाव : नवीन बी.जे. मार्केटमधील खालीद जब्बार पिंजारी यांच्या मालकीचे आर.के. इलेक्ट्रिकल्स व रिवाईडिंग वर्कस् हे दुकान फोडून चोरट्यांनी ...

B.J. The shop was blown up in the market and the fans were blown away | बी.जे. मार्केटमध्ये दुकान फोडून ग्राहकांचे पंखे लांबविले

बी.जे. मार्केटमध्ये दुकान फोडून ग्राहकांचे पंखे लांबविले

जळगाव : नवीन बी.जे. मार्केटमधील खालीद जब्बार पिंजारी यांच्या मालकीचे आर.के. इलेक्ट्रिकल्स व रिवाईडिंग वर्कस् हे दुकान फोडून चोरट्यांनी ग्राहकांचे पंखे व मोटारी लांबविल्याची घटना सोमवारी सकाळी साडेआठ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेहरुण परिसरातील रहिवासी खालीद जब्बार पिंजारी यांचे नवीन बी.जे. मार्केटमध्ये आर.के. इलेक्ट्रिकल्स व रिवाईडिंग वर्कस् नावाने दुकान आहे. या दुकानात जुन्या वस्तू दुरुस्तीच कामे केली जातात. खालीद पिंजारी यांच्या सोबत त्यांचे मामा शकील पिंजारी हेसुद्धा काम करतात. रोज सकाळी साडेआठ ते रात्री ८ या वेळेत दुकानात काम चालते. सोमवारी सकाळी साडेआठ वाजता शकील पिंजारी हे दुकान उघडण्यासाठी आले असता, दुकानाचे कुलूप गायब तर दुकान उघडे होते. त्यातील साहित्य अस्ताव्यस्त होते. दुकानात दुरुस्तीसाठी आलेले ७ पंखे, ३ पाण्याच्या मोटारी यासह बायडिंग वायर बंडल व १० किलो भंगार असा एकूण २० हजारांचा मुद्देमाल चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरीची खात्री झाल्यावर खालीद पिंजारी यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: B.J. The shop was blown up in the market and the fans were blown away