शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

एकनाथ खडसेंना मोठा धक्का, हाय व्होल्टेज निवडणुकीत पत्नी मंदाकिनी यांचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2022 11:10 IST

जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसेंचा धक्कादायक पराभव झाला असून भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी त्यांचा पराभव केला आहे.

जळगाव - माजी मंत्री एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या जळगाव जिल्ह्यातील दूध संघाच्या निवडणुकीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. सहकार क्षेत्रातील विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी शनिवारी मतदान झाले. राजकारणात एकमेकांचे कट्टर वैरी समजले जाणारे एकनाथ खडसेगिरीश महाजन या दोघांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली होती. आता, या निवडणुकांचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. हाती आलेल्या निवडणूक निकालात खडसे परिवाला मोठा धक्का बसला असून एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंचा पराभव झाला आहे. 

जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसेंचा धक्कादायक पराभव झाला असून भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी त्यांचा पराभव केला आहे. विशेष म्हणजे मंगेश चव्हाण यांनी आपला चाळीसगाव तालुका मतदासंघ सोडून खडसेंच्या मुक्ताईनगर तालुक्यातून उमेदवारी केली होती. दूध संघाच्या निवडणुकीत भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी गिरीश महाजन यांच्या शेतकरी पॅनलकडून उमेदवारी केली होती, त्यांच्या विरोधात खडसेंच्या सहकार पॅनलमधून खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे ही हायव्होल्टेज लढत होती. दरम्यान, चव्हाण आणि खडसे यांच्यात निवडणुकांपूर्वीच मोठे आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळाले होते. अखेर मंगेश चव्हाण हे विजयी झाले आहेत. 

आत्तापर्यंतचा दूध संघ निवडणूक निकाल 

जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत गिरीश महाजन यांच्या शेतकरी पॅनलने खातं उघडलं, महाजन यांचे स्विय सहायक अरविंद देशमुख विजयी, त्यांचे प्रतिस्पर्धी जिल्हा बँकेचे माजी संचालक विजय पाटील पराभूत विजय पाटील

एकनाथ खडसे यांच्या सहकार पॅनलने खातं उघडलं ओबीसी मतदारसंघातून पराग मोरे विजयी, पराग मोरे हे माजी खासदार वसंतराव मोरे यांचे चिरंजीव आहेत, मोरे यांच्या विरोधात गोपाळ भंगाळे उमेदवार होते

भाजपा आमदार संजय सावकारे एससी मतदार संघातून विजयी, प्रतिस्पर्धी श्रावण ब्रम्हे पराभूत

राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या पत्नी छाया देवकर महिला राखीव मतदार संघातून विजयी, महिला राखीव मतदार संघात एकनाथ खडसे यांच्या सहकार पॅनल सोबतच गिरीश महाजन यांच्या शेतकरी पॅनलला एक जागा मिळाली आहे, त्यात पूनम पाटील विजयी झाल्या आहेत

पारोळा तालुका मतदारसंघातून शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील विजयी, त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील पराभूत

धरणगाव तालुका मतदासंघात गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्या शेतकरी पॅनलचे संजय पवार विजयी, त्यांचे प्रतिस्पर्धी वाल्मीक पाटील पराभूत

संजय पवार हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत, त्यांनी राष्ट्रवादीऐवजी महाजन-पाटलांच्या शेतकरी पॅनलमधून निवडणूक लढवली होती

अमळनेर तालुका मतदासंघात राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील विजयी, त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या माजी आमदार स्मिता वाघ पराभूत,

20 संचालकांची निवडणूक

जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार?, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. आज सकाळी 8 वाजेपासून मतदानाला सुरूवात झाली आहे. महाविकास आघाडीचे सहकार पॅनल व भाजप-शिंदे गटाचे शेतकरी विकास पॅनलमध्ये जिल्हा दूध संघाचे 20 संचालक निवडून देण्यासाठी थेट लढत होत आहे. 

टॅग्स :Jalgaonजळगावeknath khadseएकनाथ खडसेElectionनिवडणूकGirish Mahajanगिरीश महाजन