शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! एकनाथ खडसेंविरोधात सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय? काय म्हणाले खडसे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 22:00 IST

ते तासखेड येतील गौण खनिज चोरी प्रकरणात संबंधित पोलीस ठाण्यात पोलिसांना जाब विचारण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी पोलिसांना शिविगाळ करत दमदाटी केल्याचा आरोप आहे...

जळगावमधून एक मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते तथा विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांच्याविरोधात जळगाव जिल्ह्यातील सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्यासह मंत्र्यांना शिवीगाळ करत, दमदाटी केल्या प्रकरणी त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला. ते तासखेड येतील गौण खनिज चोरी प्रकरणात संबंधित पोलीस ठाण्यात पोलिसांना जाब विचारण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी पोलिसांना शिविगाळ करत दमदाटी केल्याचा आरोप आहे. 

सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी खडसे यांच्या विरोधात फिर्याद दिली असून, त्यांच्या विरोधात सावदा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 296, 221,351(2) आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं? -संबंधित फिर्यादीनुसार, तासखेडा गौण खनीज चोरी प्रकरणाच्या तपासासंदर्भात माहिती घेण्यासाठी एकनाथ खडसे बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास  सावदा पोलीस ठाण्यात पोहोचले होते. यावेळी त्यांनी, तुम्ही तासखेडा येथील गौण खनीज संदर्भात गुन्हा दाखल केला नाही? तुम्ही त्यात कोट्यवधी रुपये खाल्ले आहेत, असा आरोप पाटील यांच्यावर केला. यावर आपण त्यांना संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल असल्याचे सांगत एफआयआर नंबरही सांगितल्याचे पाटील यांनी सांगितले. 

फिर्यादीनुसार, नंतर, खडसे यांनी पाटील यांना गुन्ह्याची कागदपत्रे मागीतली. मात्र, गुन्ह्याचा तपास सुरू असल्याने ती देता येणार नाही, तपास पूर्ण झाल्यानंतर, न्यायालयातून आपल्याला कादपत्रे प्राप्त करता येतील, असे पाटील यांनी खडसे यांना सांगितले. यावर खडसे यांनी शिविगाळ केल्याचे आणि दमदाटी केल्याचे, संबंधित फिर्यादीत म्हणण्यात आले आहे.

काय म्हणाले खडसे? -यासंपूर्ण प्रकरणावर आता खडसे यांचीही प्रतिक्रिया आली आहे. यात ते म्हणाले, "साधारणपणे अडीच महिन्यांपूर्वी ४०-५० हजार ब्रास मुरूम चोरीला गेल्याची तक्रर एका व्यक्तीने केली होती. त्याचे पुरावेही त्याने दिले होते. यावर हा रेव्हेन्यू विभागाचा भाग असल्याचे म्हणत पीएसआयने तक्रारघेण्यास नकार दिला होता. यासंदर्भात मी विधान परिषदेत डिसेंबर महिन्यात प्रश्न विचारला होता. तो पीएसआयच्या जिव्हारी लागला. एरीगेशन वाल्यांनही तक्रार दिली. यावर एफआयआर करायला टाळाटाळ केली. नंतर एफआयआप केल्यानंतर, आज अडीच महिने झाले, यासंदर्भात मी माहिती घेण्यासाठी गेलो होतो. मी म्हणालो एवढा वेळ का लागतोय? तो म्हणाला, माला वाटेल तिथपर्यंत मी चौकशी करेल. माझ्यावर काय बंधन आहे की तुमचे. रेव्हेन्यू डिपार्टमेंट वाल्यांनी पैसे खाल्ले. यावर माझ्याकडू काही अपशब्द बोलला गेला. यानंतर मी त्याला माफीही मागितली. 

यानंतर, सर्व दोन नंबरचे धंदे आहेत पत्याचे क्लब आहेत, दारूचे अड्डे आहे, यांवर कारवाई करायला तुम्हाला वेळ नाही. शेवटचा शब्द आहे, तुम्हा हाप्ते बिप्ते घेता, यामुळे अंटी करप्शनकडे जावे लागेल आणि कारवाई करावी लागेल. यांनी गुन्हा दाखल केला, करू द्या. लडायचे कायदेशीर. मी पोलीस प्राधिकरण आणि डीसीई आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहे. असे खडसे यांनी म्हटे आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Eknath Khadse Booked for Allegedly Abusing Police in Jalgaon

Web Summary : NCP leader Eknath Khadse faces charges for allegedly abusing and threatening police officers in Savda, Jalgaon, during an inquiry about illegal mining. A police complaint has been filed against him, sparking political controversy.
टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेJalgaonजळगावPoliceपोलिस