शांततेसाठी सायकल यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 16:33 IST2019-08-22T16:32:24+5:302019-08-22T16:33:43+5:30
सर्वत्र शांतता नांदावी यासाठी शहरातील तीन जण भुसावळ ते शेगाव असा सायकलने प्रवास करण्यासाठी निघाले.

शांततेसाठी सायकल यात्रा
ठळक मुद्देभुसावळ ते शेगाव सायकल यात्रा१२५ किलोमीटर अंतर पार केले आठ तासात
भुसावळ, जि.जळगाव : सर्वत्र शांतता नांदावी यासाठी शहरातील तीन जण भुसावळ ते शेगाव असा सायकलने प्रवास करण्यासाठी निघाले.
भुसावळ ते शेगाव १२५ किलोमीटर अंतर त्यांनी आठ तासात पार केले. शहरात व देशात शांतता राहो व हम सब एक है व प्रदूषण कमी कसे करता येईल हा संदेश देत त्यांनी सायकल यात्रा सुरू केली. यात भुसावळ येथे ज्येष्ठ छायाचित्रकार किरणसिंग पाटील व शंभू मेहेंदळे तसेच रेल्वे कर्मचारी विनोद राणे यांचा समावेश आहे.
गजानन महाराजांंचे दर्शन घेऊन ते भुसावळसाठी परत निघतील. पावसाळा असल्याने प्रवास खडतर आहे. तरी जिद्द ठेऊन त्यांनी प्रवास सुरू ठेवला.