भुसावळ बाजारपेठच्या सहाय्यक फौजदाराचे कोरोनामुळे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 14:39 IST2020-12-17T14:39:30+5:302020-12-17T14:39:37+5:30
आतापर्यंत दोन कर्मचार्यांचा कोरोनाने घेतला बळी

भुसावळ बाजारपेठच्या सहाय्यक फौजदाराचे कोरोनामुळे निधन
भ ुसावळ : येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार एजाजखान अहमदखान पठाण (५८) यांचे कोरोनामुळे बुधवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास निधन झाले. त्यांच्यावर जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. गेल्या१५ दिवसांपूर्वी पठाण यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझीटीव्ह आला . त्यानंतर त्यांना जळगावच्या खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांची बुधवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास प्राणज्योत मालवली. याबाबचे वृत्त भुसावळातील पोलिस दलात धडकताच कर्मचार्यांनी हळहळ व्यक् केली. कायदेशीर सोपस्कार पार पडल्यानंतर दुपारी दोन वाजता मुस्लीम कब्रस्थानात दफनविधी करण्यात आला. पठाण यांच्या पश्चात पत्नी , मुलगा, दोन मुली, जावई, सून व नातवंडे असा परीवार आहे. गेल्या ३५ वर्षांपासून पोलिस दलात कारत होते. आतापर्यंत दोन कर्मचार्यांचा कोरोनाने घेतला बळीबाजारपेठ पोलीस ठाण्यातील हजेरी मास्तर आनंदा गजरे यांचा २७मे रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला होता. या घटनेनंतर बाजारपेठ पोलिस ठाण्यातील कर्मचार्यांची कोरोना चाचणी करण्यात आल्यानंतर काही कर्मचार्यांचे अहवाल पॉझीटीव्ह आले होते. या घटनेला सात महिने उलटत नाही , तोच एएसआय एजाज पठाण यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली.