नशिराबाद येथे ट्रकच्या धडकेत भुसावळचा एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 13:13 IST2020-08-30T13:12:25+5:302020-08-30T13:13:00+5:30
नशिराबाद : जळगावहून भुसावळकडे जाणाऱ्या दुचाकीला मागून भरधाव येणाºया ट्रकने जोरदार धडक दिली़ यात दुचाकीस्वार दत्तू रघुनाथ भारंबे (५३, ...

नशिराबाद येथे ट्रकच्या धडकेत भुसावळचा एक ठार
नशिराबाद : जळगावहून भुसावळकडे जाणाऱ्या दुचाकीला मागून भरधाव येणाºया ट्रकने जोरदार धडक दिली़ यात दुचाकीस्वार दत्तू रघुनाथ भारंबे (५३, रा़ स्वामी समर्थ कॉलनी, हिरानगर, भुसावळ) हे ठार झाले़
ही घटना नशिराबाद महामार्गावरील दयावान ढाब्याजवळ गुरूवारी रात्री घडली़ याप्रकरणी कमलाकर सुरेश कोल्हे (रा. गोजोरा ता. भुसावळ) यांनी फिर्याद दिल्यावरून ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दत्तू भारंबे हे दुचाकीने (क्ऱ एमएच़१९़एस़९८९१) जळगावहून भुसावळकडे येत होते़ त्यावेळी मागून भरधाव वेगात येणाºया ट्रकने (एमएच़१८़एपी़७८६६) मागून जोरदार धडक दिली़ या धडकेत भारंबे यांना जबर दुखापत झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला़ याबाबत नशिराबाद पोलिस स्थानकात ट्रकचालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मार्गावर रात्रीच्यावेळी मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहे. रस्त्यावर पथदीप नसल्याने वाहनचालकांना रस्ताच दिसत नसल्याने अपघात वाढताहेत.