Bhusawal Iron Road Police awareness to prevent cyber crime | सायबर गुन्हे टाळण्यासाठी भुसावळ लोहमार्ग पोलिसांकडून जनजागृती
सायबर गुन्हे टाळण्यासाठी भुसावळ लोहमार्ग पोलिसांकडून जनजागृती

ठळक मुद्देकोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या ई- मेलवर क्लिक करु नकाबँकेविषयीची कोणतीच माहिती कोणालाही दूरध्वनी व मोबाईलवर देऊ नकाएटीएम कार्डचा वापर करताना एटीएम सेंटरची पाहणी करुन संशयास्पद आढळल्यास पुढील व्यवहार करणे टाळा एचटीपीएसने सुरुवात होणाऱ्या सुरक्षित संकेत स्थळाचाच वापर कराबँकेविषयीची माहिती मोबाईलमध्ये सेव्ह करू नकासायबर गुन्हा घडला असल्यास सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा

भुसावळ, जि.जळगाव : संगणक, स्मार्ट फोन यासारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या माध्यमातून होणारे संभाव्य सायबर गुन्हे टाळण्यासाठी प्रवाशांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्याचे पो.नि. दिलीप गढरी यांनी केले.
महाराष्ट्र सायबर यांच्यावतीने जनजागृतीपर पत्रके वाटून प्रवाशांमध्ये जागृती करण्याचे काम केले जात असून, यासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी ते पुढे म्हणाले की, कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या ई- मेलवर क्लिक करु नका. ई मेल पासवर्ड अ‍ॅटो सेव्ह करणे टाळा. ब्राऊजर अद्ययावत करा. संगणकावरील इस्टॉल प्रोग्रॉमकडे वेळोवेळी लक्ष ठेवा, अ‍ॅन्टी व्हायरसचा उपयोग करा. संगणकासाठी वैयक्तीक फायबर वॉल अद्ययावत करुन घ्यावा. मोबाईल स्मार्टफोनला पासवर्ड ठेवा. बँकेविषयीची माहिती मोबाईलमध्ये सेव्ह करू नका. अनोळखी व्यक्तीची मित्र रिक्वेस्ट स्वीकारु नका. अनोळखी व्यक्तीच्या लिंक्स उघडू नका. एचटीपीएसने सुरुवात होणाऱ्या सुरक्षित संकेत स्थळाचाच वापर करा. बँकेविषयीची कोणतीच माहिती कोणालाही दूरध्वनी व मोबाईलवर देऊ नका. एटीएम कार्डचा वापर करताना एटीएम सेंटरची पाहणी करुन संशयास्पद आढळल्यास पुढील व्यवहार करणे टाळा. सायबर गुन्हा घडला असल्यास सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही पो.नि.दिलीप गढरी यांनी यावेळी केले.
याप्रसंगी पोलीस कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पो.नि.दिलीप गढरी व रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांनी रेल्वे स्थानकातील मुसाफिर खान्यात सायबर गुन्हे रोखण्याबाबत प्रवाशांना जनजागृती पत्रके वाटून प्रचार व प्रसार केला.

Web Title: Bhusawal Iron Road Police awareness to prevent cyber crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.