भुसावळ-देवळाली मेमू गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड; पवन, खान्देश, हटिया-पुणे गाड्या एक ते दीड तास उशिराने

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 11:39 PM2023-09-12T23:39:27+5:302023-09-12T23:41:21+5:30

यामुळे मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या पवन, खान्देश आणि हटिया-पुणे या रेल्वे गाड्या तब्बल एक ते दीड तास उशिराने धावल्या

Bhusawal-Devlali Memu train engine failure; Pawan, Khandesh, Hatia-Pune trains late by one to one and a half hours | भुसावळ-देवळाली मेमू गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड; पवन, खान्देश, हटिया-पुणे गाड्या एक ते दीड तास उशिराने

भुसावळ-देवळाली मेमू गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड; पवन, खान्देश, हटिया-पुणे गाड्या एक ते दीड तास उशिराने

googlenewsNext

हबीब चव्हाण - 

भुसावळ (जि. जळगाव) : भुसावळ-देवळाली मेमू गाडीला तरसोदजवळ इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे तब्बल पावणेतीन तासांच्या उशिराने मॅन्युअल असिस्टंट लोकोच्या साह्याने गाडी मार्गस्थ झाली. त्यामुळे मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या पवन, खान्देश आणि हटिया-पुणे या रेल्वे गाड्या तब्बल एक ते दीड तास उशिराने धावल्या.

भुसावळ- देवळाली मेमू गाडी भुसावळ स्थानकावरून निर्धारित वेळेला निघाली. मात्र भादली-जळगाव सेक्शनमध्ये इंजिनमध्ये बिघाड झाला. सायंकाळी ५.४५ वाजता थांबलेली ही मेमू गाडी पावणे तीन तासांनी पुढे गेली. त्या मागे असलेल्या इतर गाड्यांना उशिर झाल्याने प्रवाशांनी चांगलाच संताप व्यक्त केला.

अधिकारी व कर्मचाऱ्यांची टीम घटनास्थळी
जळगाव-भादली सेक्शनमध्ये देवळाली मेमूला तांत्रिक बिघाड झाल्यामुळे भुसावळ येथून अधिकारी व कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी युद्ध स्तरावर तांत्रिक बिघाड सुधारण्याचा प्रयत्न केला. अखेर जळगाव येथून मॅन्युअल असिस्टंट लोको मागविण्यात आला व या साह्याने गाडी जळगावकडे रवाना झाली.
 

Web Title: Bhusawal-Devlali Memu train engine failure; Pawan, Khandesh, Hatia-Pune trains late by one to one and a half hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.