भुसावळात नगरसेवक व नगरसेविका पुत्रामध्ये झटापट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 15:47 IST2017-12-14T15:40:38+5:302017-12-14T15:47:54+5:30
भाजपा पदाधिकाºयांच्या बैठकीत नगरसेवक व नगरसेविका पुत्रामध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली.

भुसावळात नगरसेवक व नगरसेविका पुत्रामध्ये झटापट
आॅनलाईन लोकमत
भुसावळ,दि.१४ : भाजपा पदाधिकाºयांच्या बैठकीत नगरसेवक व नगरसेविका पुत्रामध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली.त्यामुळे भाजपातील धुसफूस चव्हाट्यावर आली. वाद पैशांच्या देवाण घेवाणवरुन वा निवडणुकीतील पाडापाडीच्या राजकारणातून झाला हे स्पष्ट होऊ शकले नाही.
नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या काच बंगल्यात १३ रोजी दुपारी ३ वा. नगरसेक व पदाधिकाºयांची बैठक झाली. त्यात हा वाद झाल्याची राजकीय चर्चा आहे. बैठक संपल्यानंतर १५ मिनिटांनी पुन्हा नगरसेवकांची बैठक झाली. मात्र या पूर्वीच नगरसेविका पुत्रासोबत नगरसेकाची झटापट सुरु झाली. सभागृहातील गोंधळामुळे एकच खळबळ उडाली. बाहेर उभे असलेले नगरसेवक व पदाधिकारी यांनी काय झाले ते पाहण्यासाठी सभागृहात धाव घेतली. प्रसंगी तेथे उपस्थित पत्रकार व छायाचित्रकार सभागृहात गेले. पत्रकारांना पाहताच पदाधिकारी वादावर सारवासारव करु लागले. मोठा वाद होऊनही भाजपाचे पदाधिकारी मात्र वाद झाला नसल्याने सांगत आहे. वादाची चांगलीच चर्चा रंगली.
नगरसेवकांमध्ये नेहमीच हासी मजाक चालते.त्याचाच हा एक भाग होता. ते नेहमीच मोठमोठ्याने आवाज करतात. अशी सारवासारव नगराध्यक्ष रमण भोळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.