भादली ग्रा.पं.नव्या वास्तूचे भूमीपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:22 IST2021-08-18T04:22:29+5:302021-08-18T04:22:29+5:30

नवीन ग्रा.पं. सचिवालय वास्तूच्या बांधकामासाठी २५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला. परिसरातील दत्त मंदिर व श्रीकृष्ण मंदिर परिसरात ...

Bhumipujan of Bhadali village new building | भादली ग्रा.पं.नव्या वास्तूचे भूमीपूजन

भादली ग्रा.पं.नव्या वास्तूचे भूमीपूजन

नवीन ग्रा.पं. सचिवालय वास्तूच्या बांधकामासाठी २५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला. परिसरातील दत्त मंदिर व श्रीकृष्ण मंदिर परिसरात पेव्हरब्लॉकच्या कामास सुरूवात करण्यात आली. पिण्याच्या पाण्यासाठी नवीन जलकुंभ, शेतरस्ते, ग्रामरस्ते आदींनादेखील मंजुरी देण्यात आली असून आगामी दोन ते तीन महिन्यात कामांना सुरूवात केली जाणार आहे.

यावेळी जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, महानगराध्यक्ष श्याम कोगटा, उपतालुका प्रमुख छगन खडसे, पं.स.सदस्य जागृती चौधरी, जनाप्पा सोनवणे,सरपंच मिलिंद चौधरी, उपसरपंच संदीप कोळी, माजी सरपंच जितेंद्र नारखेडे, शोभा झांबरे, रवींद्र पाटील, पूजा नारखेडे, मनोज चौधरी, परेश रडे, मीराबाई कोळी, जान अंजली गुरु संजना, अरुण सपकाळे, कीर्ती कोळी, भूषण पाटील, हिरालाल कोळी, संदीप कोळी, पोलीस पाटील ॲड. राधिका ढाके, आसोदा उपसरपंच पूजा भोळे, तुषार महाजन, सामाजिक कार्यकर्ते किशोर चौधरी, विकासो चेअरमन किरण रडे, विजय कावळे, ग्रामविकास अधिकारी पी.बी. अहिरे, नशिराबाद पो.स्टे.चे सहायक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शैलेश माळी यांनी केले.

Web Title: Bhumipujan of Bhadali village new building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.