शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

भोरगाव लेवा पंचायतीच्या पुढाकाराने तुटणारा ‘संसार रथ रुळावर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 3:05 PM

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भोरगाव लेवा पंचायतीचा पुढाकार  घेतला आहे.

भुसावळ : तीन वर्षापूर्वी विवाह झालेला परंतु घटस्फोटापर्यंत गोष्ट पोहोचलेला एक ‘संसार रथ’ भोरगाव लेवा पंचायतीच्या भुसावळ शाखेने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर एकत्र आणला. लेवा पंचायतीच्या मान्यवरांनी यासाठी घेतलेल्या पुढाकाराला यश आले आहे.आसोदे येथील भूषण चिरमाडे व  गोजोरे येथील कीर्ती उर्फ भारती  यांचा २०१८ मधे विवाह झाला. विवाहानंतर  एक वर्ष सर्व चांगले सुरळीत सुरू होते. पण हळूहळू त्यांच्यात वादविवाद  सुरू झाले. या दरम्यान त्यांना बाळसुध्दा झाले. पण छोट्या-छोट्या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात होऊन कीर्ती बाळाला घेऊन माहेरी गोजोरे येथे आली. काही दिवसांनी भुसावळ येथील भोरपंचायत कार्यालयात घटस्फोटासाठी अर्ज केला. परंतु समुपदेशन कक्षात कीर्ती व भूषण दोघांचे आधी वैयक्तिक व नंतर एकत्र समुपदेशन केल्यानंतर दोघांनी घटस्फोटाचा विचार रद्द करुन एकत्र संसार करण्याची इच्छा व्यक्त केली.सचिव डाॅ.बाळू पाटील व अध्यक्ष अॅड. प्रकाश पाटील यांनी पुढाकार घेऊन सर्व कायदेशीर बाबींची/ कागदपत्रांची पूर्तता करून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भुसावळ शाखेचे अध्यक्ष अॅड प्रकाश पाटील, सचिव डाॅ. बाळू पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अजय भोळे, समुपदेशन कक्षाच्या चेअरमन  आरती चौधरी, सदस्य मंगला पाटील व जयश्री चौधरी यांच्या उपस्थितीत कीर्तीला सासरी पाठवण्यात आले.कीर्ती व भूषणला सर्व सदस्यांनी आशीर्वाद देऊन भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 

टॅग्स :SocialसामाजिकBhusawalभुसावळ