चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या स्वीकृत सदस्यपदी भोज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 18:03 IST2021-06-23T18:02:10+5:302021-06-23T18:03:04+5:30
चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या स्वीकृत सदस्यपदी माजी नगराध्यक्ष व उद्योजक भोजराज प्यारेलाल पुंशी यांची निवड करण्यात आली.

चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या स्वीकृत सदस्यपदी भोज
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : शिक्षण प्रसाराचा शतकोत्तर वारसा असणाऱ्या चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या स्वीकृत सदस्यपदी माजी नगराध्यक्ष व उद्योजक भोजराज प्यारेलाल पुंशी यांची मंगळवारी निवड करण्यात आली.
बुधवारी त्यांना संस्थेच्या मॅनेजिंग बोर्डाचे चेअरमन नारायणदास अग्रवाल यांच्या हस्ते नियुक्तिपत्र देण्यात आले. मंगळवारी सायंकाळी झालेल्या संस्थेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत पुंशी यांच्या निवडीचा ठराव करण्यात आला. हा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. संस्थेचे ज्येष्ठ संचालक व करसल्लागार ज.मो. अग्रवाल यांचे निधन झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर पु़ंशी यांची निवड केली गेली. बैठकीला सचिव डॉ. विनोद कोतकर, महाविद्यालयाचे चेअरमन डॉ. एम.बी. पाटील, मु.रा. अमृतकार, बांधकाम समितीचे चेअरमन योगेश अग्रवाल, क. मा. राजपूत, सुरेश स्वार, कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन श्यामलाल कुमावत, एच.एच. पटेल प्राथमिक विद्यालयाचे चेअरमन अशोक बाबूलाल वाणी, कळंत्री प्राथमिक विद्यालयाचे चेअरमन डॉ. सुनील राजपूत, डॉ. सत्यजित पूर्णपात्रे, नीलेश छोरिया आदी उपस्थित होते.