पाचोरा स्टेट बँकेसमोर भीक मांगो आंदोलन

By Admin | Updated: April 21, 2017 16:27 IST2017-04-21T16:27:17+5:302017-04-21T16:27:17+5:30

स्टेट बँकेतील विविध सुविधांचा अभाव आणि व्यस्थापकांच्या मनमानी कारभाराविरोधात शुक्रवारी काँग्रेसतर्फे पाचोरा येथे भीक मांगो आंदोलन करण्यात आले.

Bhik Mango movement in front of Pachora State Bank | पाचोरा स्टेट बँकेसमोर भीक मांगो आंदोलन

पाचोरा स्टेट बँकेसमोर भीक मांगो आंदोलन

 पाचोरा,दि.21 -  स्टेट बँकेतील विविध सुविधांचा अभाव आणि व्यस्थापकांच्या मनमानी कारभाराविरोधात शुक्रवारी काँग्रेसतर्फे पाचोरा येथे भीक मांगो आंदोलन करण्यात आले.

स्टेट बँकेचे व्यवस्थापक रणजीत कुमार यांच्या मनमानी कारभाराविरोधात तसेच विविध नऊ मागण्यांसाठी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे जिल्हा ग्रामीणचे मुख्य संयोजक सचिन सोमवंशी यांनी 5 एप्रिल रोजी क्षेत्रीय व्यवस्थापक जळगाव यांना तक्रार अर्ज देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु कोणतीच कारवाई न झाल्याने 21 रोजी स्टेट बँकेसमोर हातात कटोरे घेत आंदोलन अनेक सचिन सोमवंशी यांचेसह अनेक कार्यकत्र्यांनी भीक मांगो आंदोलन केले. त्यानंतर स्टेट बँकेचे व्यवस्थापक रणजित कुमार यांनी आंदोलनकत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांसंदर्भात केलेल्या कार्यवाहीचे पत्र दिले. यावेळी दत्ता बोरसे, दिनेश बोथरा, नंदू सोनार, अविनाश भालेराव, जीवन जैन, पाचोरा पीपल्स बँकेचे मुख्य व्यवस्थापक नितीन टिल्लू , स्टेट बँकेचे अभिलाष बोरकर आदी उपस्थित होते.

Web Title: Bhik Mango movement in front of Pachora State Bank