राज्य सरकारकडून चांगली कामे थांबविण्याचा धडाका - भाजप जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 10:27 PM2020-02-23T22:27:38+5:302020-02-23T22:28:12+5:30

‘महाविकास’ आघाडी ‘महाभकास’ झाल्याची टीका

Bharatiya Janata Party president Haribhau Javale blamed for halting good works by state government | राज्य सरकारकडून चांगली कामे थांबविण्याचा धडाका - भाजप जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे

राज्य सरकारकडून चांगली कामे थांबविण्याचा धडाका - भाजप जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे

Next

जळगाव : राज्य सरकारच्या धोरणाविरुद्ध तसेच राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे २५ रोजी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयांसमोर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेदरम्यान धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सरकारकडून चांगली कामे थांबविण्याचा धडाका सुरु असल्याचे ते म्हणाले.
जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
या संदर्भात रविवारी पत्रकार परिषद झाली. या वेळी जावळे यांच्यासह महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, डॉ. विजय धांडे, मनोज भांडारकर उपस्थित होते. या प्रसंगी जावळे यांनी राज्य सरकारच्या धोरणावर टीका करीत भाजप सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली.
सातबारा अद्यापही कोरा नाही
भाजपचा विश्वासघात करून कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेससोबत सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेने शेतकऱ्यांचाही विश्वासघात केला असल्याचा आरोप हरिभाऊ जावळे यांनी केला.
ते म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकºयांना हेक्टरी २५ हजार रुपये व फळबागांसाठी हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली होती. मात्र या नेत्यांना आश्वासनांचा विसर पडला असून सरसकट कर्जमाफीची घोषणाही हवेत विरल्याने शेतकºयांचा सातबारा अद्यापही कोरा झाला नसल्याचे जावळे म्हणाले. सरकारची सरसकट कर्जमाफीची घोषणा म्हणजे शेतकºयांची सरसकट फसवणूक असल्याची टीका त्यांनी केली.
चांगली कामे थांबविण्याचा धडाका
भाजप सरकारने विविध कामांसाठी घेतलेल्या निर्णयांमुळे सुरू झालेली चांगली कामेही थांबविण्याचा धडाका राज्य सरकारने लावला असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. पावसाळ््यात दमदार पाऊस झाला व शेततळ््यांचीे कामे चांगलीे झाल्याने रब्बी हंगाम चांगला आला. हरभरा चांगला आला असला तरी खरेदी केंद्र नाही, तूर खरेदीही केवळ साडे तीन क्विंटलपर्यंत केली जात आहे.
राष्ट्र हिताला बाधा
सीएए वरून तेढ निर्माण करण्याचे काम सध्या सुरू असून याद्वारे राष्ट्र हिताला बाधा पोहचविण्याचे कामदेखील राज्य सरकारकडून सुरू असल्याचा आरोप जावळे यांनी केला.
महिला अत्याचारात वाढ
राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून हिंगणघाटच्या घटनेनंतरही महिलांवरील अत्याचार थांबविण्यात राज्य सरकारला अपयश आले असून पोलिसांचा धाक संपल्याची टीका जावळे यांनी केली. तीन पक्ष मिळून स्थापन झालेले हे सरकार म्हणजे ‘तिºह्या’ रंगाचे सरकार आहे, असा उल्लेख त्यांनी केला.

Web Title: Bharatiya Janata Party president Haribhau Javale blamed for halting good works by state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव