भुसावळात घरफोडी, लाखोंचा ऐवज लंपास
By Admin | Updated: April 29, 2017 11:56 IST2017-04-29T11:56:46+5:302017-04-29T11:56:46+5:30
शनिवारी पहाटे चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली.

भुसावळात घरफोडी, लाखोंचा ऐवज लंपास
ऑनलाइन लोकमत
भुसावळ, जि. जळगाव, दि. 29 - भुसावळ शहरातील गोलाणी कॉम्प्लेक्स भागातील बंद घरात चोरटय़ांनी घरफोडी करीत लाखोंचा ऐवज लंपास केला़ शनिवारी पहाटे चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली.
भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरीमधील कर्मचारी सपना नीलेश शिंदे या बाहेर गेलेल्या होत्या. त्यांचे घर बंद असल्याची संधी साधत चोरटय़ांनी लाखोंच्या ऐवजावर डल्ला मारला़ चोरटय़ांनी 18 ग्रॅमची पोत, सहा व चार ग्रॅमची अंगठी, 12 ग्रॅमचे टोंगल, दहा ग्रॅमचे कर्णफुले, चांदीचे जोडवे, पैंजण व 15 हजारांची रोकड लांबवली़