भीमा -कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पाळधी येथे रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 18:33 IST2018-01-06T18:27:40+5:302018-01-06T18:33:22+5:30
भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणास दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी जळगाव-औरंगाबाद महामार्गावर शनिवारी सकाळी १० वाजता नाचणखेडा चौफुलीवर दीड ते दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

भीमा -कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पाळधी येथे रास्तारोको
आॅनलाईन लोकमत
पाळधी, ता.जामनेर : भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणास दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी जळगाव-औरंगाबाद महामार्गावर शनिवारी सकाळी १० वाजता नाचणखेडा चौफुलीवर दीड ते दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
पाळधी येथे शनिवारी सकाळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून सामूहिक वंदना घेण्यात आली. या ठिकाणावरून मोर्चास प्रारंभ झाला. यावेळी तालुक्यातील महिला पुरूषांनी सहभाग नोंदविला. अतिशय शिस्तबध्द व छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहु, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी मंडळ अधिकारी पहूर डी. एम. कोळी व सहा.पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी अॅड.प्रशांत बाविस्कर, अविनाश निकम, प्रा.नाना बाविस्कर, सरपंच कमलाकर पाटील, भगवान सोनवणे, कौतीक बाविस्कर, सरपंच डिंगाबर माळी, किरण बाविस्कर, मुकेश बाविस्कर, दीपक बाविस्कर, शालिक बाविस्कर, नंदु इंगळे, देवलसिंग परदेशी, अशोक बाविस्कर उपस्थित होते.