भागवत महाजन यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:18 IST2021-05-25T04:18:39+5:302021-05-25T04:18:39+5:30

जळगाव : भागवत सेनू महाजन (७२) यांचे सोमवारी पुणे येथे निधन झाले. ते मूळ चांगदेव, ता. मुक्ताईनगर ...

Bhagwat Mahajan passes away | भागवत महाजन यांचे निधन

भागवत महाजन यांचे निधन

जळगाव : भागवत सेनू महाजन (७२) यांचे सोमवारी पुणे येथे निधन झाले. ते मूळ चांगदेव, ता. मुक्ताईनगर येथील रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. ते महेंद्र महाजन यांचे वडील व लोकमतचे निर्मिती व्यवस्थापक अरविंद महाजन यांचे सासरे होत.

फोटो

राजेंद्र बारी

धानोरा, ता. चोपडा : राजेंद्र भिला बारी (४८) यांचे सोमवारी निधन झाले, ते शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, वैजापूर, तालुका चोपडा येथे कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. ते जितेंद्र बारी यांचे मोठे भाऊ होत.

फोटो

रामकृष्ण चौधरी

फैजपूर : वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीतील सेवानिवृत्त कर्मचारी रामकृष्ण (सुरेश) नेमा चौधरी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. ते रेमंड कंपनीतील कर्मचारी निलेश चौधरी यांचे वडील होत.

फोटो

कमलाबाई चोपडे

फैजपूर : कमलाबाई श्यामराव चोपडे (८७, रा. भालोद) यांचे रविवारी कल्याण येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते सेवानिवृत्त शिक्षक रमेश श्यामराव चोपडे यांच्या मातोश्री होत.

Web Title: Bhagwat Mahajan passes away