At Bhadgaon, a barking dog took 3 persons | भडगाव येथे पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला १० जणांना चावा
भडगाव येथे पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला १० जणांना चावा

भडगाव, जि. जळगाव : भडगाव शहरासह परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ सुरू असून या पिसाळलेल्या कुत्र्याने १० जणांना चावा घेतला. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
गेल्या काही दिवसांपासून या पिसाळलेल्या कुत्र्याची मोठी दहशत पसरली असून नागरिक भयभीत झाले आहेत. या कुत्र्याने तब्बल १० जणांना चावा घेतल्याने रहिवासी विशेषत: लहान मुले घराबाहेर पडताना घाबरत आहेत. उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

Web Title: At Bhadgaon, a barking dog took 3 persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.