अ. भा. राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाची कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:12 IST2021-06-23T04:12:25+5:302021-06-23T04:12:25+5:30

भुसावळ : अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाच्या राष्ट्रीय मीडिया ऑनलाइन कार्यशाळेचा समारोप नुकताच झाला. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय ...

A. Bha. Workshop of National Federation of Education | अ. भा. राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाची कार्यशाळा

अ. भा. राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाची कार्यशाळा

भुसावळ : अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाच्या राष्ट्रीय मीडिया ऑनलाइन कार्यशाळेचा समारोप नुकताच झाला.

प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रसिद्धीप्रमुख सुनील आंबेकर, अखिल भारतीय शैक्षणिक महासंघाचे अध्यक्ष प्रा. जे.पी सिंघल, अ.भा. सोशल मीडियाचे सहप्रमुख रोहित कौशल, अ.भा संघटनमंत्री महेंद्र कपूर, अ.भा. सहमीडियाप्रमुख बसंत जिंदल, अ.भा. मीडिया सेलप्रमुख विजयकुमार सिंह, महाराष्ट्र राज्यातून खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे अध्यक्ष कां.रं. तुंगार, मुख्य सचिव प्रकाश देशपांडे, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य कृष्णा हिरेमठ, देवकृष्ण व्यास आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी मीडिया सेलचे सदस्य राजेंद्र कोरे, विश्वजीत माणिक शेट्टी, नंदकुमार हंबर्डे, रसिका परब, सुरेंद्र तिके, जीवन महाजन, रमेश शिंगाडे यांच्यासह २१५ सदस्यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन मीडिया सेलचे सदस्य दर्शन भारती, बसंत जिंदल यांनी केले.

Web Title: A. Bha. Workshop of National Federation of Education