यावल तालुक्यातील दगडी मनवेल येथे लाभार्थी घरकुलांपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 18:23 IST2019-01-30T18:20:57+5:302019-01-30T18:23:56+5:30
यावल तालुक्यातील दगडी-मनवेल गावी ४३ पात्र लाभार्र्थींना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकाºयांचा आदेश असूनही दोन वर्षापासून जागा त्यांच्या नावावर होत नसल्याने घरकुल योजनेपासून लाभार्थी वंचित आहेत.

यावल तालुक्यातील दगडी मनवेल येथे लाभार्थी घरकुलांपासून वंचित
यावल, जि.जळगाव : तालुक्यातील दगडी-मनवेल गावी ४३ पात्र लाभार्र्थींना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकाºयांचा आदेश असूनही दोन वर्षापासून जागा त्यांच्या नावावर होत नसल्याने घरकुल योजनेपासून लाभार्थी वंचित आहेत. या आशयाचे निवेदन ग्रामस्थांनी तहसीलदार कुंदन हिरे व पंचायत समितीला दिले आहे.
तालुक्यातील मनवेल-दगडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेल्या दगडी व मनवेल येथील ४३ पात्र लाभार्र्थींना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकाºयांनी १३ आॅक्टोबर २०१६ च्या पत्रानुसार आदेश दिले आहेत. तथापि, दोन वर्षे होऊनही त्यांना जागा नावावर करून देण्याची कार्यवाही प्रशासनाकडून पूर्ण झालेली नाही.
या लाभार्र्थींचे नाव सन २००२ ते २००७ च्या दारिद्र्य रेषेखालील यादीत नाव होते. मात्र सध्या त्यांची नावे नसल्याने लाभार्थी घरकुलापासून वंचित आहेत, असे निवेदन तहसीलदार कुंदन हिरे आणि यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांना दिले आहे.