शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये संशयित ४०० बँक खाती तपासली; जम्मू आणि काश्मीरमधील डॉक्टरांचे  लागेबांधे
2
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पंकजा मुंडेचे PA अनंत गर्जे यांना अटक, आज कोर्टात हजर करणार !
3
Sangli Accident: नशेत राँग साईडने निघाला, ६ गाड्या उडवल्या, अनेक जखमी; संतप्त लोकांनी स्कोडा कार फोडली
4
"मुंबई महापालिकेची ही शेवटची निवडणूक असेल, त्यानंतर..."; राज ठाकरेंचा 'मराठी माणसा'ला सावध राहण्याचा इशारा
5
"उदयपूरमध्येच आमची लव्हस्टोरी...", रणवीर सिंहने दीपिकासोबतच्या आठवणींना दिला उजाळा
6
म्युच्युअल फंडावर टॅक्स कसा लागतो? इक्विटी आणि डेट फंडसाठीचे नियम काय, टॅक्स वाचवण्याचे मार्ग जाणून घ्या
7
कोण होणार नवीन पोलिस महासंचालक?; सदानंद दाते यांच्या नावाची चर्चा, केंद्राकडे नावे पाठवली
8
आजचे राशीभविष्य, २४ नोव्हेंबर २०२५: मन आनंदी राहील, आर्थिक लाभ होतील, नोकरीत लाभ होतील !
9
'बिग बॉस मराठी ६' लवकरच? कलर्स मराठीने शेअर केला 'धमाकेदार' प्रोमो, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
10
अनंतच्या अनैतिक संबंधाची खात्री झाल्याने ‘ती’  खचली; एकदा अचानक आई वडील घरी पोहचले, तेव्हा...
11
१५ दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता, २ डिसेंबरला लग्न पण त्याआधीच मयुरेशवर काळाने घाला घातला
12
वयाच्या ४१ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं लग्न, वृंदावन मंदिरात अभिनेत्यासोबत अडकली विवाहबंधनात
13
"टर्मिनेटरसारखी फिरतेय..." श्रद्धा कपूरच्या पायाला दुखापत, स्वत: व्हिडीओ शेअर करत दिली माहिती
14
‘टीईटी’चा पेपर ३ लाखांत, शिक्षकांची टोळीच जेरबंद; कोल्हापुरात शिक्षकी पेशाला काळीमा
15
बिना ड्रायव्हरच्या कारपेक्षा त्याची टेक्नॉलॉजी भारतासाठी महत्त्वाची; इस्रायली उद्योगपतींशी चर्चा
16
पाक खोटे बोलतोय...फ्रान्सने केला पर्दाफाश; जगाकडूनही खावी लागली चपराक, काय केला खोटा दावा?
17
कमळावर जाे उभा त्याला मतदान करा; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वबळाचे संकेत?
18
मुंबईत तब्बल ११ लाख दुबार नावे आढळली; मतदार याद्यांमध्ये प्रचंड घाेळ, BMC कडे तक्रारींचा पाऊस
19
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
20
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

वरणगाव पालिकेच्या विषय समिती निवडीचा विषयही खंडपीठात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 01:51 IST

वरणगाव नगरपालिकेत भाजपाची सत्ता असून तथापि त्यांच्यात दोन गट निर्माण झाले आहेत. त्यांचा गटनेता कोण? हा वाद न्यायालयात गेला असताना विषय समित्यांचाही विषयही तेथे गेला आहे.

ठळक मुद्देविषय समित्यांचे प्रस्ताव सीलबंद पाकिटात खंडपिठात सादर करण्याचे आदेशगटनेता कोण? या विषयाची न्यायालयात सुरू आहे सुनावणी .

वरणगाव जि. जळगाव : नगर पालिकेच्या विषय समित्यांच्या निवडीसाठी शनिवारी बोलावलेल्या बैठकीत दाखल झालेले प्रस्ताव पाकिटात सीलबंद करून ते २८ आॅगस्टपूर्वी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्याचे आदेश मिळाल्याने आता हा विषयही न्यायालयात पोहचला आहे.पालिकेत भाजपाची सत्ता असून तथापि त्यांच्यात दोन गट निर्माण झाले आहेत. त्यांचा गटनेता कोण? हा वाद न्यायालयात गेला असताना विषय समित्यांचाही विषयही तेथे गेला आहे.शनिवारी वरणगाव नगर पालिकेच्या विषय समित्यांच्या निवडीकरीता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. पिठासीन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर उपस्थित होते. तथापि सभा सुरु होण्याआधी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने विषय समित्यांचे प्रस्ताव दाखल करून घेण्याचे आदेश पिठासीन अधिकाऱ्यांना देत, दाखल झालेले हे प्रस्ताव खंडपीठाकडे २८ आॅगस्टच्या आत सीलबंद लिफाप्यात पाठविण्याचे आदेश दिले. आदेशाप्रमाणे पिठासीन अधिकारी डॉ.चिंचकर हे विषय समित्यांचे प्रस्ताव सीलबंद करून ते उच्च न्यायालयात सादर करणार आहेत.या सभेस नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शे.अखलाकसह सर्व नगरसेवक सभागृहात उपस्थित होते.यावेळी मुख्याधिकारी सौरभ जोशीसह लिपीक संजय माळी, गंभीर कोळी यांनी कामकाजात सहकार्य केले.काय आहे प्रकरण ?१८ सदस्यीय वरणगाव नगर पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच नगरसेवक तर शिवसेनेचा एक, चार अपक्ष नगरसेवक असून भाजपाचे आठ सदस्य आहेत. अपक्षांच्या साथीने पालिकेत भाजपाची सत्ता आहे. या आधी अडीच वर्षे अरूणाबाई इंगळे यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळला होता. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर दुसºया अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत वेगवान हालचाली घडत, अध्यक्षपदासाठी भाजपाचे दोन उमेदवार रिंगणात उतरल्याने त्यावेळी भाजपाच्या गोटात फूट पडून दोन गट निर्माण झाले. एक गट माजी मंत्री एकनाथराव खडसे समर्थकांचा तर दुसरा गट जलसंपदामंत्री गिरीश महाजन समर्थक असे तयार झाल्याने अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान गटनेते सुनील काळे यांनी पक्षादेश काढला. तर दुसºया गटाने नितीन माळी यांची गटनेतेपदी निवड करून तशी रितसर नोंदणी केली.दरम्यान, नगराध्यक्ष निवडीच्या पूर्वसंध्येला माळी यांनी पक्षादेश काढून अध्यक्षपदाच्या उमेदवार रोहिणी जावळे यांना भाजपा सदस्यांनी मतदान करण्याचे सांगितले. तथापि या निवडणुकीत जलसंपदामंत्री महाजन गटाची सरसी होऊन सुनील काळे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तसेच अपक्षांच्या मदतीने अध्यक्षपदी निवडून आले होते.गटनेता कोण? प्रकरण न्यायालयातएका गटाकडून पक्षादेशाचे पालन केले नाही, म्हणून नगराध्यक्ष सुनील काळे, आरोग्य सभापती नसरीनबी कुरेशी तथा बाल आणि महिला कल्याण समितीच्या सभापती माला मेढे या तिघांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, याकरीता जिल्हाधिकाºयांकडे अर्ज दाखल करण्यात आला. त्यावर सुनावणी दरम्यान एका गटाने उच्च न्यायालयात धाव घेत गटनेता कोण? ते आधी ठरवावे. त्यानंतरच अपात्रतेच्या कारवाईबाबत सुनावणी व्हावी, अशी याचिका दाखल केल्याने याबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी सुरु आहे.याच दरम्यान विषय समिती निवडीचा कार्यक्रम लागल्याने पालिकेत भाजपाचा गटनेता कोण? हा वाद न्यायालयात असल्याने दोन गटनेत्यांपैकी निवड समितीचा प्रस्ताव दाखल करण्याचा अधिकार कोणाला आहे, हा वाद निर्माण झाल्याने पुन्हा उच्च न्यायालयाकडे एका गटाने धाव घेत आधी गटनेता कोण हे न्यायालयाने आधीच्या दाखल याचिकेवर सुनावणी तात्काळ करावी. अन्यथा विषय समिती निवडणूक कार्यक्रम थांबवावा असा अर्ज दाखल केल्याने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दोन्ही (भाजप) गटांचे प्रस्ताव सीलबंद लिफाफ्यात न्यायालयात सादर करण्याचे आदेश पिठासीन अधिकाºयांना दिले आहेत.दरम्यान, भाजपाकडून दोन स्वतंत्र विषय समित्यांचे प्रस्ताव तर राष्ट्रवादी काँग्रेस कडूनही विषय समित्याचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Courtन्यायालय