नगरपालिका कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:13 IST2021-07-01T04:13:47+5:302021-07-01T04:13:47+5:30
चर्चेअंती कामबंद आंदोलन मागे सातव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम मिळत नसल्याने १६५ कर्मचारी आणि २१५ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी नगरपालिकेसमोर दिनांक ...

नगरपालिका कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन मागे
चर्चेअंती कामबंद आंदोलन मागे
सातव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम मिळत नसल्याने १६५ कर्मचारी आणि २१५ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी नगरपालिकेसमोर दिनांक ३० जूनपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले होते. मात्र मुख्याधिकारी अविनाश गांगोडे, नगराध्यक्षा मनीषा चौधरी, नगरसेवक हितेंद्र देशमुख, रमेश शिंदे, राजाराम पाटील यांच्या उपस्थितीत चर्चा होऊन फरकाच्या प्रथम टप्प्याची रक्कम लवकरच दिली जाईल, असे आश्वासन दिले. म्हणून कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
- दीपक घोगरे, भारतीय मजदूर युनियन संघ, तालुकाध्यक्ष, चोपडा
कामबंद आंदोलन मागे घेण्यासाठी आपणासोबत कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली. त्यात आपण सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम लवकरच देणार असल्याचे तोंडी आश्वासन दिले असल्याची माहिती संघटनेने दिली आहे, असे मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांना सांगितल्यानंतर गांगोडे म्हटले की, मी कोणत्याही प्रकारचे कुणालाही आश्वासन दिलेले नाही. कामगारांना आंदोलन करा किंवा आंदोलन मागे घ्या, असेही सांगितले नाही. तसेच कामबंद आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आपण बिनापगारी रजा करणार आहेत का? असे विचारले असता याबाबत आंदोलनात कोणकोणते कर्मचारी सहभागी होते, त्याबाबत माहिती मिळवून योग्य तो निर्णय घेईल आणि शासकीय धोरणानुसार रक्कम मिळण्यासाठी पूर्वीपासून प्रक्रिया सुरू आहे. आता मात्र कोणत्याही प्रकारचे आश्वासन प्रशासनातर्फे दिलेले नाही.
- अविनाश गांगोडे, मुख्याधिकारी, नगरपालिका चोपडा.