सुमठाणे येथील कुटुंबाचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:13 IST2021-06-03T04:13:01+5:302021-06-03T04:13:01+5:30

सुमठाणे, ता. पारोळा येथील सर्जेराव पाटील यांचा मारहाणीत मृत्यू झाला आहे. त्यांना मारहाण करणाऱ्या त्या आरोपींना अटक करा. त्यांच्यावर ...

Behind the family's hunger strike in Sumthane | सुमठाणे येथील कुटुंबाचे उपोषण मागे

सुमठाणे येथील कुटुंबाचे उपोषण मागे

सुमठाणे, ता. पारोळा येथील सर्जेराव पाटील यांचा मारहाणीत मृत्यू झाला आहे. त्यांना मारहाण करणाऱ्या त्या आरोपींना अटक करा. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा, अशी सुमठाणे येथील या कुटुंबीयांची मागणी होती. पाटील यांच्या कुटुंबातील सदस्य पत्नी भारती सर्जेराव पाटील, मुलगा सागर पाटील, मुलगी गायत्री पवार व पल्लवी पवार हे ३१ मेपासून तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ उपोषणाला बसले होते. दिनांक १ जून रोजी रात्री मृताची पत्नी भारती पाटील यांचा रक्तदाब कमी झाला होता. उपोषणाला बसले असल्याने त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली होती.

दि. २ जून रोजी जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील, तहसीलदार अनिल गवांदे, पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांनी उपोषणकर्त्या कुटुंबाला विश्वासात घेतले. पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांनी मृत सर्जेराव पाटील यांचा शवविच्छेदनाचा अहवाल नाशिक येथून आल्यानंतर त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण कळून येईल. जर मारहाणीमुळे सर्जेराव पाटील यांचा मृत्यू झाला आहे असे कारण असेल, तर या सर्व आरोपींच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा तत्काळ दाखल करू, असे आश्वासन मिळाल्यानंतर रोहन पाटील यांनी या कुटुंबाला लिंबूपाणी देऊन त्यांचे उपोषण मागे घेतले.

Web Title: Behind the family's hunger strike in Sumthane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.