स्मशानूभीचे सुशोभीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:13 IST2021-07-01T04:13:42+5:302021-07-01T04:13:42+5:30
जळगाव : शहरातील शिवाजीनगर भागातील स्मशानभूमीचे सुशोभीकरण रोटरी क्लब ऑफ स्टार्सतर्फे करण्यात आले. या सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर बुधवारी ...

स्मशानूभीचे सुशोभीकरण
जळगाव : शहरातील शिवाजीनगर भागातील स्मशानभूमीचे सुशोभीकरण रोटरी क्लब ऑफ स्टार्सतर्फे करण्यात आले. या सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर बुधवारी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते या कामाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगरसेवक नवनाथ दारकुंडे, रोटरी क्लबचे अध्यक्ष धनराज कासट, सागर मुंदडा, राजेंद्र भामरे, अपर्णा म्हस्के, करण ललवाणी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
मोकाट कुत्रे निर्बींजीकरणास लवकरच सुरुवात
जळगाव - शहरातील मोकाट कुत्र्यांची प्रमुख समस्या लवकरच मार्गी लागणार आहे. नंदुरबार येथील नवसमाज बहुद्देशीय संस्थेची निविदा मंजूर झाली असून वाटाघाटीत संस्थेने ९३८ रुपयांपेक्षा एक रुपयाही कमी करण्याची तयारी दाखवलेली नाही. त्यामुळे याच दराला आता पुढच्या स्थायी समिती सभेत मंजुरी मिळणार आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसात प्रत्यक्षात कामाला सुरूवात होणार आहे.
४७ हॉकर्सचा माल जप्त
जळगाव - मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून शहरातील मुख्य बाजारपेठ व इतर भागात व्यवसाय करणाऱ्या हॉकर्सविरोधात तीव्र कारवाईची मोहीम हाती घेतली असून, बुधवारी बळीराम पेठ, अक्सानगर व पिंप्राळा परिसरात रस्त्यालगत व्यवसाय करणाऱ्या ४७ हॉकर्सवर कारवाई करून, त्यांचा माल जप्त करण्यात आला आहे.