विवाहितेला भररस्त्यावर मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:13 IST2021-06-24T04:13:40+5:302021-06-24T04:13:40+5:30

तालुक्यातील एका गावातील ३० वर्षीय महिला मंगळवारी रात्री नवीन बस स्थानकावरून रिक्षाने आव्हाणे येथे जाण्यासाठी निघाली होती. रिक्षातील गॅस ...

Beating a married woman to death | विवाहितेला भररस्त्यावर मारहाण

विवाहितेला भररस्त्यावर मारहाण

तालुक्यातील एका गावातील ३० वर्षीय महिला मंगळवारी रात्री नवीन बस स्थानकावरून रिक्षाने आव्हाणे येथे जाण्यासाठी निघाली होती. रिक्षातील गॅस संपल्याने चालक गॅस भरण्यासाठी वाल्मीकनगर परिसराकडे गेला. तेथून परत येत असताना रिक्षा सुरू होत नसल्याने तरुण रिक्षा ढकलत घेऊन आला. मदत म्हणून विवाहित रिक्षाला धक्का देण्यासाठी खाली उतरली असता एका जणाने वाईट नजरेने बघितले. त्याचा जाब विचारला असता तिघांनी वाद घालून मारहाण केली. तपास पोलीस निरीक्षक भीमराव नांदूरकर करीत आहेत.

भाजी विक्रेत्यांची हाणामारी

जळगाव : मानराज पार्कजवळ बुधवारी सकाळी विजय रानू भोगे (वय ३०, रा.दूध फेडरेशन),आकाश शिवाजीराव गावंडे व सागर गावंडे (रा.रामेश्वर कॉलनी) भाजीपाला विक्रेत्यांमध्ये दुकान लावण्यावरून वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाल्याने विक्रेत्यांनी भाजी कापण्याच्या चाकूने एकमेकांवर वार केले. घटनेत दोन्ही विक्रेते जखमी झाले असून याप्रकरणी पोलिसात परस्पर विरोधी तक्रार देण्यात आलेल्या आहेत.

Web Title: Beating a married woman to death