आईला शिवीगाळ केल्याचा जाब विचारणाऱ्या मुलाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:12 IST2021-06-01T04:12:46+5:302021-06-01T04:12:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : आईला शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने विक्की संजय अहिरे (वय १९) या तरुणाला बेदम मारहाण ...

Beating a child who asks for an answer for abusing his mother | आईला शिवीगाळ केल्याचा जाब विचारणाऱ्या मुलाला मारहाण

आईला शिवीगाळ केल्याचा जाब विचारणाऱ्या मुलाला मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : आईला शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने विक्की संजय अहिरे (वय १९) या तरुणाला बेदम मारहाण करून डोक्यात बाटली मारल्याची घटना हरीविठ्ठल नगरातील रेल्वेपुलाजवळ घडली. याप्रकरणी सतीश संजू पाटील (वय २५) व नितीन संजय बारी (वय २७) या दोघांविरुद्ध सोमवारी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विक्की अहिरे हा आई सुरेखाबाई व भाऊ नीलेश यांच्यासह राहतो. विक्की हा मजुरी करून कुटुंबीयाचा उदरनिर्वाह करतो. ३० मे रोजी रात्री ९ वाजता हरीविठ्ठल नगरातील भिलवाडी परिसरात राहणारे सतीश संजू पाटील (राजपूत) व नितीन संजय बारी हे दोघे काहीही कारण नसताना सुरेखा अहिरे यांना शिवीगाळ करत होते. आईला शिवीगाळ का करतो असे विक्कीने विचारले असता सतीशने विक्कीच्या कानात मारली तर डोक्यात बाटली मारून जखमी केले आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. उपचारानंतर विक्की याने रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली. तपास ललित भदाणे करीत आहेत.

Web Title: Beating a child who asks for an answer for abusing his mother