शेतीच्या वादातून प्रौढाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:11 IST2021-07-03T04:11:54+5:302021-07-03T04:11:54+5:30
जळगाव : शेती वाटपाच्या कारणावरून विजय भावसिंग परदेशी (४७, विटनेर) यांना त्यांच्या दोन्ही भावांसह पुतण्या व भावजयी यांनी ...

शेतीच्या वादातून प्रौढाला मारहाण
जळगाव : शेती वाटपाच्या कारणावरून विजय भावसिंग परदेशी (४७, विटनेर) यांना त्यांच्या दोन्ही भावांसह पुतण्या व भावजयी यांनी लाकडी काठीने मारहाण केली. ही घटना गुरुवारी सायंकाळी ७ वाजता विटनेर येथे घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विटनेर येथे विजय परदेशी हे पत्नी शीलाबाई व मुलांसह वास्तव्यास आहे. त्यांचे शेती हिस्से वाटपावरून भाऊ संजय, राजेंद्र, तसेच पुतण्या रामधन व भावजयी अलका परदेशी यांच्याशी वाद सुरू आहे. गुरुवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास चौघे जण घरी विजय यांच्या घरी आले व त्यांना शिवीगाळ करू लागले. शिवीगाळ का करीत आहे, याचा जाब त्यांनी विचारला असता, चौघांनी त्यांना काठीने मारहाण केली. यात त्यांच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्त्राव होऊ लागला. भांडण सोडविण्यासाठी पत्नी शीलाबाई याही तेथे आल्या असता, त्यांनाही मारहाण करण्यात आली. अखेर रात्री एमआयडीसी पोलीस ठाणे गाठत विजय परदेशी यांनी दोन्ही भाऊ, भावजयी, तसेच पुतण्याविरुद्ध तक्रार दिली असून, त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.