शेताच्या बांधावरून मारहाण, एक जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:12 IST2021-06-18T04:12:22+5:302021-06-18T04:12:22+5:30

निखिल नितीन पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्याची आजी सुशीलाबाई मुरलीधर पवार व चुलत भाऊ हिम्मत कैलास पाटील ...

Beaten on a farm dam, one injured | शेताच्या बांधावरून मारहाण, एक जण जखमी

शेताच्या बांधावरून मारहाण, एक जण जखमी

निखिल नितीन पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्याची आजी सुशीलाबाई मुरलीधर पवार व चुलत भाऊ हिम्मत कैलास पाटील हे १६ रोजी शेतात काम करीत असताना शेजारील शेतातील विनोद सुरेश पाटील, सुरेश शिवाजी पाटील, मनोहर शिवाजी पाटील, शिवाजी गोबजी पाटील हे आजी सुशीलाबाईशी बांधाच्या जुन्या वादावरून शिवीगाळ व मारहाण करीत होते, तेव्हा निखिल व हिम्मत दोघे आजीला सोडवायला गेले असता, विनोद याने हातातील कुऱ्हाडीने उलट्या बाजूने हिम्मत याच्या डोक्यावर व कंबरेवर मारून जखमी केले. सुरेश मनोहर, शिवाजी यांनीदेखील लाकडी दांडक्याने हातावर, पायावर मारहाण करून जखमी केले.

सुरेशने निखिलच्या हातावर लाकडी दांडका मारून जखमी केले. त्यानंतर ते दवाखान्यात आले असता, मनोहर याने आजोबा गोरख भुता पवार यांनादेखील भांडणाच्या कारणावरून शनिमंदिराच्या ओट्यावरून खाली ढकलून दुखापत केली. याबाबत अमळनेर पोलीस स्टेशनला चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Web Title: Beaten on a farm dam, one injured