वेळोदे शिवारार आढळला बिबट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 18:48 IST2019-04-02T18:47:50+5:302019-04-02T18:48:20+5:30
एकावर हल्ल्याचा प्रयत्न

वेळोदे शिवारार आढळला बिबट्या
वेळोदे, ता. चोपडा: शिवारात बिबट्याचा वावर आढळून आला आहे. सोमवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास दत्तात्रय रामदास चौधरी हे शेतात जात असतांना यांच्यावर बिबटयाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी मोटारसायकलचा वेग वाढविल्याने अनर्थ टळला. त्यांना कुठली दुखापत झाली नाही. या घटनेमुळे मात्र शेतकऱ्यांमध्ये भिती चे वातावरण निर्माण झाले आहे.