जळगाव शहरात दोन मद्यपी पोलिसांमध्ये बारमध्ये हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 22:59 IST2018-02-20T22:55:33+5:302018-02-20T22:59:01+5:30

 अजिंठा चौक परिसरातील एका बिअर बारमध्ये एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या दोन कर्मचाºयांमध्ये मंगळवारी रात्री साडे आठ वाजता जोरदार हाणामारी झाली. यात दारुच्या बाटल्यांची तोडफोडही झाली. गुन्हे शोध पथकाच्या अन्य पोलीस कर्मचा-यांनी धाव घेऊन हा वाद मिटविला.दरम्यान,शिस्तीचे खाते समजले जाणा-या पोलीस दलातील कर्मचा-यांमध्ये अलिकडे हाणामारीच्या सातत्याने घटना घडत आहेत.

In a bar in Jalgaon city, two alcoholic policemen | जळगाव शहरात दोन मद्यपी पोलिसांमध्ये बारमध्ये हाणामारी

जळगाव शहरात दोन मद्यपी पोलिसांमध्ये बारमध्ये हाणामारी

ठळक मुद्दे गुन्हेगारासोबत केली पार्टी अजिंठा चौक परिसरात रात्री ८.३० वाजताची घटनादारुच्या बाटल्यांची तोडफोड

आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,२१:  अजिंठा चौक परिसरातील एका बिअर बारमध्ये एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या दोन कर्मचा-यांमध्ये मंगळवारी रात्री साडे आठ वाजता जोरदार हाणामारी झाली. यात दारुच्या बाटल्यांची तोडफोडही झाली. गुन्हे शोध पथकाच्या अन्य पोलीस कर्मचा-यांनी धाव घेऊन हा वाद मिटविला.दरम्यान,शिस्तीचे खाते समजले जाणा-या पोलीस दलातील कर्मचाºयांमध्ये अलिकडे हाणामारीच्या सातत्याने घटना घडत आहेत.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अजिंठा चौक परिसरात एका लॉजिंग व परमीट रुम असलेल्या या हॉटेलमध्ये मंगळवारी सायंकाळी एमआयडीसी पोलीस स्टेशनचा एक डी.बी.कर्मचारी अवैध धंदे चालक तसेच पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारासोबत पार्टी करायला बसला होता. हा गुन्हेगार डी.बी.च्या दुस-या कर्मचाºयाचाही जवळचा मित्र असल्याने तो देखील या हॉटेलमध्ये गेला. तू इथे कसा म्हणून त्याने या कर्मचाºयाला जाब विचारला असता त्यावरुन दोघांमध्ये शाब्दीक वाद, शिवीगाळ व नंतर त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. प्रकार इतका वाढला की एका कर्मचाºयाने हॉटेलमधील दारुच्या बाटल्यांचीही तोडफोड केली.

Web Title: In a bar in Jalgaon city, two alcoholic policemen