विवाहितेवर बँकेतच बलात्कार करणाऱ्या व्यवस्थापकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:21 IST2021-02-17T04:21:28+5:302021-02-17T04:21:28+5:30

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, सप्टेबर २०१७ मध्ये पंतप्रधान कर्ज योजनेची माहिती घेण्यासाठी ही महिला मैत्रिणीसह शिव कॉलनीतील स्टेट बँकेच्या ...

Bank manager arrested for raping married woman | विवाहितेवर बँकेतच बलात्कार करणाऱ्या व्यवस्थापकाला अटक

विवाहितेवर बँकेतच बलात्कार करणाऱ्या व्यवस्थापकाला अटक

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, सप्टेबर २०१७ मध्ये पंतप्रधान कर्ज योजनेची माहिती घेण्यासाठी ही महिला मैत्रिणीसह शिव कॉलनीतील स्टेट बँकेच्या शाखेत गेली होती. यानंतर १५ दिवसांनी महिलेस सुट्टीच्या दिवशी बँकेत बोलावले. बँकेत कोणीही नसल्याची संधी साधत शर्मा याने महिलेस गुंगीचे औषध टाकून शीतपेय पिण्यास दिले. त्यानंतर त्याने बँकेतच त्यांच्यावर अत्याचार केला व त्याच वेळी आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ तयार केले. याच व्हिडीओद्वारे त्याने महिलेला ब्लॅकमेल करून लग्नाचे आमिष दिले. त्यासाठी महिलेस घटस्फोट घेण्यास भाग पाडले. असे पीडितीने फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी शर्मा याला मंगळवारी न्या. एस.जी. ठुबे यांच्या न्यायालयात हजर केले. सरकारी वकील रमाकांत सोनवणे यांनी युक्तिवाद केला.

Web Title: Bank manager arrested for raping married woman