बंजारा समाजबांधवांचा चाळीसगावात मोर्चा

By Admin | Updated: July 1, 2017 18:25 IST2017-07-01T18:25:21+5:302017-07-01T18:25:21+5:30

बंजारा समाजच्या विविध मागण्या : रेणके आयोग लागू होत नसल्याने नाराजी

Banjara Social Movements in Chaalisgaon | बंजारा समाजबांधवांचा चाळीसगावात मोर्चा

बंजारा समाजबांधवांचा चाळीसगावात मोर्चा

 ऑनलाईन लोकमत

चाळीसगाव,दि.1 - बंजारा समाज, भटक्या विमुक्त जमातींच्या विविध समस्यांबरोबरच चाळीसगाव तालुक्यातील विविध मागण्यांसाठी  बंजारा क्रांती दलातर्फे 1 रोजी शहरात काढण्यात आलेल्या लाठीमोर्चातील घोषणांनी शहर दणाणले होते. 
शनिवारी सकाळी 11 वाजता बंजारा क्रांती दलाचे  राष्ट्रीय अध्यक्ष राकेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कार्यालयावर काढण्यात आलेल्या लाठी मोर्चाचा प्रारंभ शासकीय विश्रामगृहापासून झाला. सिग्नल चौक, स्टेशन रोड, घाट रोड, आडवा बाजार, सराफ बाजारमार्गे तहसील कार्यालयवर मोर्चा आल्यानंतर त्याचे रुपांतर सभेत झाले.
व्यासपीठावर रेणके आयोगाचे अध्यक्ष बाळकृष्ण रेणके, राष्ट्रीय अध्यक्ष राकेश जाधव, भटक्या विमुक्तचे नेते सुंदर डांगे, कामगार नेते गिरीश जगताप, मदन खोत, संदीप राठोड, रामनाथ साबळे, संतोष रावत, साहेबराव राठोड, राजेंद्र जाधव, शेषराव जाधव, सुभाष राठोड आदी उपस्थित होते. 

Web Title: Banjara Social Movements in Chaalisgaon