'पीओपी' मूर्तीवरील बंदी उठवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:19 IST2021-01-19T04:19:06+5:302021-01-19T04:19:06+5:30
जळगाव : प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच्या निर्मिती व विक्रीविरोधात असलेली बंदी केंद्र सरकारने तत्काळ कायमस्वरूपी उठवावी, या मागणीसाठी जळगाव ...

'पीओपी' मूर्तीवरील बंदी उठवावी
जळगाव : प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच्या निर्मिती व विक्रीविरोधात असलेली बंदी केंद्र सरकारने तत्काळ कायमस्वरूपी उठवावी, या मागणीसाठी जळगाव जिल्हा मूर्तिकार संघटनेने धुळे व नंदुरबार संघटनेच्या सोबत २० जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचे आयोजन केले आहे. जिल्हा मूर्तिकार संघटनेच्या नेतृत्त्वाखाली जळगाव, धुळे, नंदुरबार या तिन्ही संघटनांची जळगावात बैठक झाली. त्यात केंद्र सरकारने प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच्या निर्मितीविरोधात घातलेल्या बंदीविरोधात चर्चा करण्यात आली. केंद्राचे पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी येणाऱ्या माघी गणेशोत्सव व नवरात्रोत्सवासाठी पीओपी वापराच्या निर्बंधातून १२ जानेवारी रोजी तूर्तास मुक्त केले आहे. या निर्णयाचे स्वागत असले तरी ही बंदी कायमस्वरूपी उठवावी, याविषयी तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मूर्तिकार संघटनेची मागणी आहे.