बहुजन मुक्ती पार्टीतर्फे कर्जमुक्तीसाठी निदर्शने
By Admin | Updated: July 24, 2015 20:08 IST2015-07-24T20:08:17+5:302015-07-24T20:08:18+5:30
शेतकर्यांच्या कर्जमुक्तीसाठी बहुजन मुक्ती पार्टीतर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

बहुजन मुक्ती पार्टीतर्फे कर्जमुक्तीसाठी निदर्शने
जळगाव : शेतकर्यांच्या कर्जमुक्तीसाठी बहुजन मुक्ती पार्टीतर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
केंद्र व राज्य सरकारचे धोरण शेतकरी बहुजन विरोधी असून राज्यात शेतकर्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. त्यांना न्याय देण्यासाठी कर्ज मुक्तीची घोषणा करावी, राज्यात संपूर्ण दारूबंदी करावी, दुष्काळ जाहीर करावा, भूमी अधिग्रहण कायदा रद्द करावा, केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, स्मृती इराणी, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण यांनी राजीनामा द्यावा यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रा. शिवाजी पाटील, भारत मुक्ती मार्चाचे जिल्हाध्यक्ष मुकुंद सपकाळे, संजय सपकाळे, रेखा बोराडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.