शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात पहिलाच वानप्रस्थाश्रम साकारतोय बहादरपूरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 19:38 IST

महाराष्टÑात पहिलाच वानप्रस्थाश्रम बहादरपूर, ता.पारोळा येथे साकारणार असल्याचा दावा रेमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त नीलिमा मिश्रा यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत केला.

ठळक मुद्देरेमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त नीलिमा मिश्रा यांची माहितीमहाराष्टÑात पहिलाच वानप्रस्थाश्रम असल्याचा नीलिमा मिश्रा यांचा दावा

रावसाहेब भोसलेपारोळा, जि.जळगाव : महाराष्टÑात पहिलाच वानप्रस्थाश्रम बहादरपूर, ता.पारोळा येथे साकारणार असल्याचा दावा रेमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त नीलिमा मिश्रा यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत केला. लोकवर्गणीतून हा हा आश्रम उभा राहावा यासाठी त्यांनी नववर्षापासून गावोगावी फिरून मदतीसाठी फिरणे सुरू केले आहे.प्रश्न- वानप्रस्थाश्रम उभारण्याची कल्पना कशी सुचली?नीलिमा दीदी- लहानपणी पाहिले होते की एका वृद्धाने आपल्या सुनेकडे जेवण मागितले होते. तिने त्या वृद्ध सासऱ्याच्या तोंडावर दोन रुपयांचे नाणे फेकून मारले होते. तेव्हा या वृद्धांसाठी काही तरी करावे या उद्देशाने प्रयत्न करीत होते.गेल्या २१ वर्षांपासून समाजात वावरताना असे जाणवले की, समाजात असे अनेक लोक आहेत की त्यांच्या तरुण वा वृद्धपणातील अपेक्षा राहून गेल्या आहेत. काही तरी वेगळे करण्याची उर्मी राहून गेली. ते करण्यासाठी या लोकांना वानप्रस्थाश्रम उभे करून त्याचा सामाजिक वा वैयक्तिक इच्छा पूर्ती व्हावी यासाठी ही कल्पना ३१ डिसेंबर २०१९ रोजी सुचली.प्रश्न- वानप्रस्थाश्रम उभारणीसाठी शासनाचे अनुदान का नाही?नीलिमा दीदी- या वानप्रस्थाश्रमासाठी शासनाचा निधी घेतला तर शासनाच्या अटी, शर्ती आणि शासनाच्या बंधनात हा वानप्रस्थाश्रम चालवावा लागेल. वानप्रस्थाश्रमाची माझ्या मनातील संकल्पना खूप वेगळी आहे.प्रश्न- वानप्रस्थाश्रमाची नेमकी वेगळी काय संकल्पना आहे?नीलिमा दीदी- या वानप्रस्थाश्रम बहादरपूर येथे ग्रामपंचायतीच्या तीन एकर जागेत उभा करावयाचा आहे. या वानप्रस्थाश्रमात वर्षभरातून ५० ते ७५ वर्ष वयोगटातील व्यक्तीला तीन वेळा १५ दिवसांसाठी या ठिकाणी राहायला मिळेल. त्या दरम्यान त्यांच्या मनातील राहिलेला गोष्टी म्हणजे संगीत, गायन पोहणे, शिकणे, वाचन करणे, विविध खेळ खेळणे, सामाजिक कार्य करणे या सर्व गोष्टींसाठी त्यांना या वानप्रस्थाश्रमात सोयी उपलब्ध करून त्याचे स्वप्न पूर्ण केले जातील. कोणतीही बंधने त्यांच्यावर नसतील.प्रश्न- वृद्धाश्रम आणि वानप्रस्थाश्रम यात नेमका काय फरक?नीलिमा दीदी- वृद्धाश्रम ही संकल्पना मोडीत काढण्यासाठी हा वानप्रस्थाश्रम आहे. या वानप्रस्थाश्रमात येणाºया प्रत्येक वृद्ध व्यक्तीची कुटुंबापासून ताटातूट होणार नाही. काही दिवस वानप्रस्थाश्रमात राहून पुन्हा तो कुटुंबात रममाण होईल. हाच फरक वृद्धाश्रम आणि वानप्रस्थाश्रम राहील.प्रश्न- वानप्रस्थाश्रमासाठी पायी यात्रेतून काय हेतू साधणार?नीलिमा दीदी- गेल्या २१ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना. आपण लोकांना बचत गटाच्या माध्यमातून जोडले गेलो आहेत. याचा फायदा वानप्रस्थाश्रम उभारणीच्या कामासाठी करून घ्यावा म्हणून पहिल्या ४० दिवसांच्या खान्देश पायी यात्रेतून या वानप्रस्थाश्रमासाठी कार्यकर्ते उभारणी होईल. लोकांशी मुक्तपणे संवाद साधला जाईल. लोकांच्या भावना कळतील. वानप्रस्थाश्रमासाठी निधी लोकवर्गणीतून उभा करता यावा हाच हेतू आहे.प्रश्न- वानप्रस्थाश्रमासाठी निधी कसा उभा करणार?नीलिमा दिदी- वानप्रस्थाश्रम उभारणीसाठी एखादा मोठा उद्योजक यांनी निधी ही दिला असता. पण लोकवर्गणीतून हा पैसा उभा राहिला पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रातून हा पैसा गोळा केला जाणार आहे. त्यासाठी आमच्या बचत गटाच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेली उत्पादन त्यात मसाला, हळद लोणचे, धना पावडर या सर्व साहित्याचे एक ५०० रुपये किमतीचे किट तयार करण्यात आले आहे. ते ग्रामीण भागात पदयात्रा वेळी लोकांना सांगितले जाते. महिला ते किट खरेदी करतात व यातून जो नफा आहे तो वानप्रस्थाश्रम उभारणीसाठी वापरला जाणार आहे.प्रश्न- या पदयात्रेसाठी लोकांचा प्रतिसाद कसा मिळत आहे?नीलिमा दीदी- गेल्या ११ दिवसांपासून पदयात्रेच्या माध्यमातून अनेक गावांना भेटी दिल्या. लोकांचा प्रचंड सकारात्मक प्रतिसाद आहे. लोक स्वत:हून या वानप्रस्थाश्रम उभारणीसाठी वैयक्तिक आर्थिक मदत करीत आहे. एवढ्या एक दीड वर्षात हा अद्ययावत असा वानप्रस्थाश्रम उभारला जाईल, याबाबत आशावादी आहे.निराधार लोकांसाठी अम्मा छत्रालय उभारणार असल्याची भावना नीलिमा मिश्रा यांनी बोलून दाखविली.

टॅग्स :SocialसामाजिकParolaपारोळा