घरोघरी जाऊन करणार कोरोनाविषयी जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:21 IST2021-09-08T04:21:53+5:302021-09-08T04:21:53+5:30
जळगाव : गणेशोत्सव काळात गणेश मंडळांकडून विविध जनजागृतीपर अभियान राबविण्यात येणार आहे. त्यांतर्गत यंदा पांझरापोळ भागातील तरुण कुढापा गणेश ...

घरोघरी जाऊन करणार कोरोनाविषयी जनजागृती
जळगाव : गणेशोत्सव काळात गणेश मंडळांकडून विविध जनजागृतीपर अभियान राबविण्यात येणार आहे. त्यांतर्गत यंदा पांझरापोळ भागातील तरुण कुढापा गणेश मित्रमंडळाकडून संभाव्य तिसऱ्या लाटेच्या संदर्भात घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात येणार आहे. यंदा मंडळाचे ५८ वे वर्ष आहे.
तरुण कुढापा गणेश मंडळाची कार्यकरिणी नुकतीच जाहीर झाली आहे. अध्यक्ष म्हणून पंकज भावसार यांची, तर उपाध्यक्ष म्हणून उपाध्यक्ष सुमित सपकाळे यांची निवड करण्यात आली आहे. कार्याध्यक्ष दीपक मराठे, सेक्रेटरी राजेंद्र पाटील, सहसेक्रेटरी संदीप भावसार, खजिनदार भोजराज बारी, सहखजिनदार भूषण पाटील म्हणून यांची निवड करण्यात आली आहे. दरवर्षी तरुण कुढापा गणेश मित्रमंडळाकडून विविध नाट्यप्रयोग केले जातात तर आरास तयार केली जाते. दरम्यान, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करून गणरायाची स्थापन मंडळात केली जाणार आहे. तर गणेशोत्सव काळात मंडळाकडून घरोघरी जाऊन कोरोनाबाबत काय काळजी घ्यावी, यासंदर्भात माहिती दिली जाणार आहे. सोबत लसीकरण संदर्भातही जनजागृती केली जाणार आहे.
०००००००००००००००
वज्रेश्वरी देवी गणेश मंडळ राबवणार रोजगार उत्सव
जळगाव : वर्षभर कोरोना विषाणूने हाहाकार माजविला. परिणामी, अनेकांचा रोजगार बुडाला तर काहींचा व्यवसाय ठप्प झाला. त्यामुळे यंदा सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाकडून रोजगार उत्सव हा अभियान होती घेण्यात आला आहे़ हे अभियान शिवाजीनगर भागातील वज्रेश्वरी देवी गणेश मित्रमंडळाकडून राबविला जाणार आहे. मंडळाचे यंदाचे ११ वे वर्ष आहे.
वज्रेश्वरी गणेश मंडळाची नुकतीच कार्यकरिणीही जाहीर झाली आहे. अध्यक्षपदी दीपक नगरकर, तर उपाध्यक्ष म्हणून कार्तिक कुळकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. सचिव धनंजय चौधरी, कार्याध्यक्ष प्रणव नेवे, खजिनदार सौरभ जाधव, सहखजिनदार म्हणून भावेश पाटील यांची निवड झाली आहे. सदस्य म्हणून किशोर बोरसे, हर्षल पालोदकर, राहुल कुळकर्णी, कुणाल अडकमोल, मारुती चिकने, तन्वीर शेख यांचा समावेश आहे. वज्रेश्वरी देवी गणेश मंडळाकडून सन २०१८ हे वर्ष पर्यावरणपूरक वर्ष साजरे करण्यात आले होते. त्यांतर्गत पाच हजार रोपांचे वाटप नागरिकांना केले गेले होते. सन २०१९ मध्ये पाच गोरगरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या शैक्षणिक खर्चाचा भार मंडळाने उचलला होता. तर दर्शनाला येणाऱ्या मुलांना वह्या वाटप करण्यात आल्या होत्या. यंदा तरुणांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न मंडळाकडून केला जाणार असून लसीकरण मोहीम, रक्तदान शिबिर व अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.