ठळक मुद्देमला मिळालेला पुरस्कार हा चाळीसगावकरांचाच सन्मान -मीनाक्षी निकम स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र सोबत १० हजार रुपये, शाल देवून पुरस्कार प्रदान
चाळीसगाव : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून 'वसुंधरा' फाऊंडेशनतर्फे 'वसुंधरा रत्न' २०२१ पुरस्काराचे वितरण शिवजयंतीदिनी करण्यात आले होते. यंदाचा २०२१ हा पुरस्कार दिव्यांग बंधू-भगिनी तसेच घटस्फोटीत, विधवा गरीब महिला यांच्या सबलीकरणासाठी लढा देणाऱ्या व खास महिलांसाठी सामाजिक कार्याची ज्योत लावली अशा दिव्यांग भगिनी मीनाक्षी निकम यांना अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.महेश पाटील, योगाचार्य बाबासाहेब चंद्रात्रे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्रारंभी माता जिजाऊ, शिवरायांच्या प्रतिमेचे मान्यवरांनू पूजन केले. कार्यक्रमाला आमदार मंगेश चव्हाण, निवृत्त ब्रिगेडियर नातू, सर्पमित्र राजेश ठोंबरे, उमंग सृष्टी परिवाराच्या संस्थापिका संपदा उन्मेश पाटील, वसुंधरा फाउंडेशनच्या अध्यक्ष धरती सचिन पवार, जिजाऊ उत्सव समितीच्या सोनल साळुंखे, नगरसेविका सविता राजपूत, नगरसेवक घृष्णेश्वर पाटील उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना मनोगतात मीनाक्षी निकम यांनी सांगितले की, चाळीसगावच्या मातीतील जनमाणसांनी मला पुरस्कार देऊन माझी अधिक जबाबदारी वाढवली आहे. चाळीसगाववासीयांनी दिलेला पुरस्कार हा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. मला नेहमीच प्रोत्साहन देणारा राहील. तसेच हा पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणादायी असून, हा पुरस्कार माझा नसून संपूर्ण चाळीसगावकरांचा असल्याचे त्यांनी सांगितले. या पुरस्कारात स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र सोबत १० हजार रुपये, शाल, श्रीफळ देवून पुरस्कार प्रदान करण्यात आला.मान्यवरांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील, मंदार पाठक, योगेश राजधर पाटील, प्रमोद चव्हाण, सचिन दायमा, सुरेश शेटे , रोटरीचे अध्यक्ष प्रकाश कुलकर्णी, राजेंद्र कुलकर्णी, कवी रमेश पोद्दार, पप्पू राजपूत, बबडी शेख उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वसुंधरा फाऊंडेशनचे सुनील भामरे, रविराज परदेशी, सचिन मोरे, अजय जोशी, धर्मराज खैरनार, मनोज पाटील, मनीष मगर, मुकेश गोसावी, सोनू अहिरे, भोजराज खैरे, सचिन पवार यांनी परिश्रम घेतले.दिव्यांगांसाठी झटणाऱ्या मीनाक्षी निकम यांना ‘वसुंधरा रत्न’ पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 16:14 IST