५१ शिक्षक व कर्मचारी यांना पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:19 IST2021-09-14T04:19:54+5:302021-09-14T04:19:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : हजरत बिलाल बहुउद्देशीय सोसायटी तर्फे आयोजित जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार सोहळा ...

Awarded to 51 teachers and staff | ५१ शिक्षक व कर्मचारी यांना पुरस्कार प्रदान

५१ शिक्षक व कर्मचारी यांना पुरस्कार प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : हजरत बिलाल बहुउद्देशीय सोसायटी तर्फे आयोजित जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार सोहळा व दहावी-बारावी, निबंध स्पर्धा बक्षीस वितरण व गुणगौरव कार्यक्रम रविवारी उत्साहात पार पडला.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रफिक जमील शेख होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठातील प्रभारी वित्त व लेखा अधिकारी मधुलिका सोनवणे, गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांची उपस्थिती होती. या मान्यवरांच्या हस्ते ५१ शिक्षक व कर्मचारी यांना पुरस्कार देण्यात आला. तसेच निबंध स्पर्धेतील ६ विद्यार्थ्यांना मेडल, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तर इयत्ता दहावी व बारावीतील ५० गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. याप्रसंगी अलाहाज मजीद जके रिया, ॲड. शहेबाज शेख, किशोर सूर्यवंशी, अहमद हुसैन, उल्हाज गफार मलिक, शीतल जडे, गनी मेमन, मजीद जकेरिया, गायत्री शिंदे, अजमल शाह, सुरेश सोनवणे आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन शकीर यांनी केले तर आभार अकिल पहेलवान यांनी मानले.

Web Title: Awarded to 51 teachers and staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.