याप्रसंगी अतुल पाटील यांच्याहस्ते केक कापून सत्कार करण्यात आला. यावेळी प्रगतशील शेतकरी प्रमोद नेमाडे, एम. बी. तडवी,पी. ई. पाटील, जळगाव महानगरपालिकेचे नगरसेवक सचिन पाटील, अभय देवरे, मनिष चौधरी, किरण तडवी, अताउल्ला खान, हकीम शेख, अजय पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. शहरात आगामी पंचवार्षिकमध्ये सन २०५० च्या जनगणनेनुसार प्रत्येक नागरिकास मुबलक पाणी मिळावे, म्हणून शेळगाव बॅरेज वरून पाणी घेण्यात येणार असल्याचे नियोजन आहे. असे नगरसेवक अतुल पाटील म्हणाले. प्रा. किरण दुसाने यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पी.ई. पाटील, डॉ. वानखेडे, चंद्रकांत चौधरी, नगरसेवक सचिन पाटील यांची भाषणे झाली. प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष मुकेश येवले, ॲड. देवकांत पाटील, नगरसेवक अभिमन्यू चौधरी, समीर मोमीन शेख, शेख असलम नबी, डॉ. सोहेल
खान,एजाज देशमुख, मो. फारुख हाजी आदी उपस्थित होते.