शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

केळी वाहतुकीसाठी कॉंक्रीटचे रस्ते करण्याचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील रावेर, यावलसह जळगाव तालुक्यातील तापी नदीच्या काठावर केळी उत्पादन मोठ्या प्रमाणात होत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यातील रावेर, यावलसह जळगाव तालुक्यातील तापी नदीच्या काठावर केळी उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असले तरी यासाठी डांबरीकरण केलेल्या रस्त्यांनी नेहमी डागडुजी करावी लागते. ही समस्या लक्षात घेऊन केळी उत्पादन होत असलेल्या क्षेत्रात कॉंक्रीटचे रस्ते तयार करण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहे.

शुक्रवारी तालुक्यातील किनोद येथील शिवसंपर्क अभियानाच्या कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे होते. यावेळी शिक्षकसेना जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सपकाळे, डॉ.कमलाकर पाटील, तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण,संजय पाटील, जि.प. पवन सोनवणे, मुकेश सोनवणे, पंचायत समिती सभापती ललिता पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी यांच्यासह परिसरातील १५ सरपंच उपस्थित होते.

किनोदला स्वतंत्र वीज उपकेंद्र सुरू करणार

किनोदसह परिसरासाठी ३३ केव्ही क्षमता असणारे स्वतंत्र वीज उपकेंद्र सुरू करणार असल्याचे आश्‍वासन पालकमंत्र्यांनी दिले. यासोबत कार्यकर्त्यांनी जनतेच्या नेहमी संपर्कात राहून लोकांची कामे करावी, असे आवाहन देखील पालकमंत्र्यांनी केले. शिवसंपर्क अभियानादरम्यान भोकर पंचायत समिती गणातील ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, समाज मंदिर परिसर व इतर शासकीय कार्यालयांमध्ये ५०० वृक्ष लागवड करून जोपासना करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.