जळगावात मनपाचे गाळे सील करताना उपायुक्तांना कोंडण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 12:40 IST2019-10-14T12:39:38+5:302019-10-14T12:40:01+5:30
व्यापाऱ्यांसोबत पोलीस ठाण्यातच वाद

जळगावात मनपाचे गाळे सील करताना उपायुक्तांना कोंडण्याचा प्रयत्न
जळगाव : जळगाव महानगरपालिकेच्या करार संपलेल्या गाळ््यांवर कारवाई दरम्यान गाळे सील करीत असताना मनपा उपायुक्त उत्कर्ष गुट्टे यांना एका गाळ््यात कोंडण्याचा प्रयत्न झाला. या प्रकाराने मोठी खळबळ उडाली. या सोबतच या कारवाईवरून उपायुक्त गुट्टे व व्यापाऱ्यांमध्ये पोलीस ठाण्यातच वाद झाला.