डाॅक्टर पतीच्या छळाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:45 IST2020-12-04T04:45:15+5:302020-12-04T04:45:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : डॉक्टर असलेल्या पतीपासून सातत्याने होत असलेल्या छळाला कंटाळून राहत्या घरातच पंख्याला दोरी बांधून आत्महत्या ...

डाॅक्टर पतीच्या छळाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : डॉक्टर असलेल्या पतीपासून सातत्याने होत असलेल्या छळाला कंटाळून राहत्या घरातच पंख्याला दोरी बांधून आत्महत्या करायला निघालेल्या विजयालक्ष्मी भरत सोनवणे (५०) या महिलेला एमआयडीसी पोलिसांमुळे जीवदान मिळाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री आयोध्या नगरात घडली. विजयालक्ष्मी यांना माहेरच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
आयोध्या नगरातील श्री अपार्टमेंटमध्ये डॉ.भरत सोनवणे, पत्नी विजयालक्ष्मी, मुलगा सचिन, सून वैशाली असे कुटुंबासह वास्तव्याला आहेत. डॉक्टर व पत्नी यांच्यात अनेक दिवसापासून वाद आहेत. बुधवारी रात्री देखील हा वाद उफाळून आला. त्या संतापात विजयालक्ष्मी यांनी आपल्या खोलीत जाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तत्पूर्वी त्यांनी पोलिसांना फोन करीत आपण आत्महत्या करीत असल्याचे सांगितले होते. पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दरवाजा तोंडून या महिलेला बाहेर काढले.