बोदवड येथे महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 14:44 IST2020-05-10T14:43:01+5:302020-05-10T14:44:01+5:30
नगरपंचायतीच्या कर्मचाºयाने महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

बोदवड येथे महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न
बोदवड, जि.जळगाव : येथील नगरपंचायतीच्या कर्मचाºयाने महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. या कर्मचाºयाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनुसार, शहरातील एक महिला शनिवारी रात्री घराबाहेर झोपलेली होती. तेव्हा नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी ज्ञानेश्वर सीताराम फाटे याने महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. या महिलेने आरडाओरड केली. तेव्हा परिसरातील नागरिक जागे झाल्यावर या कर्मचाºयाने घटनास्थळावरून पळ काढला, अशी फिर्याद या महिलेने बोदवड पोलिसात दिली आहे. त्यावरून भा.दं.वि. कलम ३५४, अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा ३, १ डब्ल्यू (२) प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे,